डॉ. धनंजय सावळकर महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकपदी
By आनंद डेकाटे | Updated: April 19, 2023 16:58 IST2023-04-19T16:57:50+5:302023-04-19T16:58:29+5:30
यापूर्वी ते सह संचालक या पदावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कार्यरत होते.

डॉ. धनंजय सावळकर महानिर्मितीच्या कार्यकारी संचालकपदी
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी या मूळ पदावर कार्यरत असलेले डॉ. धनंजय सावळकर यांनी महानिर्मिती कंपनीत कार्यकारी संचालक(मानव संसाधन) या पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते सह संचालक या पदावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे कार्यरत होते.
डॉ. सावळकर हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशु संगोपन पदव्युत्तर शिक्षणासोबत कायद्याची पदवी संपादित केली आहे तसेच रियल इस्टेट व्यवस्थापन पदविका शिक्षण देखील पूर्ण केले आहे. त्यांची कारकीर्द विक्रीकर निरीक्षक, उपजिल्हाधिकारी,उप विभागीय अधिकारी, राज्यमंत्री (सामान्य प्रशासन व ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, इत्यादी महत्वाच्या पदांचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.
स्पर्धेच्या युगात महानिर्मितीच्या मनुष्यबळाचे कौशल्य अधिकाधिक विकसित करून एकूणच वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढविणे, सांघिक भावनेसह सशक्त वातावरण निर्माण करणे तसेच मनुष्यबळाशी निगडित समस्यांचे प्राधान्याने निरसन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.