डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपूरचे सीपी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:01 IST2018-07-29T01:00:17+5:302018-07-29T01:01:48+5:30
नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. तसा आदेश मात्र अद्यापपर्यंत येथे पोहचला नाही.

डॉ. भूषणकुमार उपाध्याय नागपूरचे सीपी ?
ठळक मुद्देव्यंकटेशम पुण्याचे आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. तसा आदेश मात्र अद्यापपर्यंत येथे पोहचला नाही.
उपाध्याय यांना नागपूरचा दांडगा अनुभव आहे. ते काही काळ नागपूर शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त आणि नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राहिलेले आहेत.