डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात
By Admin | Updated: July 15, 2014 01:15 IST2014-07-15T01:15:08+5:302014-07-15T01:15:08+5:30
कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कार्याच्या प्रगतीसाठी वैद्यकीय शिक्षण

डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी बोलवली बैठक
नागपूर : कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कार्याच्या प्रगतीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी बुधवारी बैठक बोलविली. यात रुग्णालयाच्या बांधकामासोबतच, पदभरती व अतिविशेषोपचार अभ्यासक्र मावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. ‘एम्स’च्या घोषणेसोबतच आता या रुग्णालयाच्या विकासाची कार्य हाती घेण्यात येत असल्याने शहराची वाटचाल देशाचे मध्यवर्ती मेडिकल हब होण्याच्या दिशेन सुरू झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र हे बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. ३ मार्च रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
आता हेच रुग्णालय ५६८ खाटांचे होणार आहे. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. त्यावर आता बांधकामासाठी ४९९९३ चौरस मीटर बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी होणाऱ्या बैठकीत बांधकामासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०७३ पदे भरण्याला प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहायक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग तीन व चारची पदेही भरली जाणार आहेत. (प्रतिनिधी)
शहराची वाटचाल मेडिकल हबकडे
मेयो, मेडिकल, डागासह सुपरस्पेशालिटी रुग्णालयासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा विकास आणि ‘एम्स’ची घोषणा यामुळे शहराचे मेडिकल हब होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. डॉ. आंबेडकर रुग्णालयात औषध वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोगशास्त्र, चर्मरोगशास्त्र, सायकॅट्रिक, नेत्ररोगशास्त्र, नेफ्रॉलॉजी, युरॉलॉजी, हिमॅटॉलॉजी, इएनटी, सीव्हीटीएस, ट्रॉमा केअर, अपघात विभाग, भूल विभाग, न्यूरॉलॉजी, न्युरोसर्जरी या सारखे पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार विभाग असणार आहे. याचा फायदा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात तज्ज्ञ फॅकल्टी उपलब्ध होण्यासोबतच रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.