शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत शंका, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:56 IST

नागपूरमध्ये भाजपा आमदारांशी संवाद साधल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली

नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यांतील हाडवैर सर्वश्रुत आहे आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणे यांनी विधिमंडळाचे कामकाज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर चौफेर टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमक असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. सध्याच्या परिस्थितीत मला राज्याची चिंता वाटते. राज्याचे उत्पन्न वाढले पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. माात्र सध्याचे मुख्यमंत्री तसे प्रयत्न करतील याबाबत मला शंका वाटते, असे नारायण राणे म्हणाले. नागपूरमध्ये भाजपा आमदारांशी संवाद साधल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री जुना की नवा यात जाणार नाही पण मुख्यमंत्री कर्तबगार पाहिजे. राज्यासमोर असलेल्या प्रश्नांची माहिती आणि ते सोडवण्याची धमन असणारा मुख्यमंत्री राज्याला हवा. महाराष्ट्र अधोगतीकडे गेल्यास सत्ताधारी जबाबदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा अवमान केल्याचाही आरोप नारायण राणेंनी केला. ''राज्यपाल विधिमंडळ परिसरात येतात तेव्हा मुख्यमंत्री स्वागताला जातात, पण ह्या प्रथा परंपरा मुख्यमंत्री डावलत आहेत. मी राज्यपालांचे अभिभाषण आणि त्यावर आभार मानणारे मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचले. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना अशा प्रकारचे भाषण यापूर्वी एकाही मुख्यमंत्र्याने केले नव्हते. ज्या शैलीतून राज्यपालांना मानसन्मान मिळेल असे भाषण केले पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणामधून अत्यंत हलक्या थराची भाषा वापरली गेली, असा आरोप नारायण राणेंनी केला.   राज्यासाठी जनतेचे हित समोर ठेवणारे असे भाषण राज्यपालांनी केले. मात्र त्याला साजेसं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही, असेही ते म्हणाले. शिवसेनेने केवळ सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. पण शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी झाला होता. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते ना आघाडी झाली असती,  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फक्त स्वतःच्या साठी मुख्यमंत्री झाले, विचारांना मूठमाती दिली, आसा आरोपही नारायण राणेंनी केला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा