घाबरू नका, बोगस रेशन कार्ड रद्द करण्यासाठी मागितली जातेय माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:52+5:302021-04-11T04:07:52+5:30
नागपूर : अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी मोहीम राबविली आहे. ही माहिती बोगस रेशन कार्ड ...

घाबरू नका, बोगस रेशन कार्ड रद्द करण्यासाठी मागितली जातेय माहिती
नागपूर : अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी मोहीम राबविली आहे. ही माहिती बोगस रेशन कार्ड धारकांचे कार्ड रद्द करण्यासाठी मागितली जात आहे. ज्यांचे रेशन कार्ड नियमानुसार आहे, त्यांना घाबरण्याची गरज नाही. त्यांना नियमित रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारी धान्य मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याची पुष्टी केली आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपूर्वी रेशन दुकानदार कार्डधारकांकडून एक फॉर्म भरून घेत होते. या फॉर्मसोबत शपथपत्रसुद्धा होते. ज्यात लिहिले होते की गॅस सिलिंडर असेल तर रेशन कार्ड रद्द होईल. या शपथपत्रावरून कार्डधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सिलिंडरची नोंद केल्यास रेशन कार्ड रद्द होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. यासंदर्भात लोकमतने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, स्पष्ट केले की रेशन कार्ड रद्द होणार नाही. कार्डधारकांकडून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती यासाठी मागितली जात आहे की, बोगस रेशन कार्डची माहिती पुढे येईल.
फक्त बोगस रेशन कार्ड रद्द होणार आहे.
सरकारच्या निर्देशानुसार ही माहिती गोळा करण्यात येत आहे. कुठल्याही कार्डधारकाचे रेशन कार्ड रद्द होणार नाही. केवळ बोगस रेशन कार्ड धारकांचे कार्ड रद्द करण्यासाठी ही माहिती मागितली जात आहे. नियमानुसार असलेल्या कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द होणार नाही.
- रोहिणी पाठराबे, अन्न पुरवठा अधिकारी