शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

यशासाठी ‘शॉर्टकट’ वापरूनका : व्हीव्हीएस लक्ष्मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:10 AM

खेळात यशस्वी होण्यासाठी समर्पितभाव, ध्यास आणि उत्कृष्ट तयारी या गोष्टींची गरज असते. ज्या खेळाडूंकडे या तिन्ही गोष्टी आहेत, तोच यशोशिखर गाठू शकतो, असे सांगून झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट मारू नका, असा मोलाचा सल्ला भारताचा महान कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने क्रिकेटपटूंना दिला.

ठळक मुद्देव्हीसीएचा वार्षिक पुरस्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: खेळात यशस्वी होण्यासाठी समर्पितभाव, ध्यास आणि उत्कृष्ट तयारी या गोष्टींची गरज असते. ज्या खेळाडूंकडे  या तिन्ही गोष्टी आहेत, तोच यशोशिखर गाठू शकतो, असे सांगून झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट मारू नका, असा मोलाचा सल्ला भारताचा महान कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने क्रिकेटपटूंना दिला.विदर्भ क्रिकेट संघटनेतर्फे बुधवारी सिव्हील लाईन्स येथील स्टेडियममध्ये आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण उपस्थित होता. बापुना करंडकासाठी बंगाल रणजी संघासोबत आलेला लक्ष्मण विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करताना म्हणाला, खेळाडूने स्वप्ने नक्की पाहावीत, पण कुठलेही स्वप्न रात्रभरात पूर्ण होत नाही.स्वप्न साकारण्यासाठी कठोर मेहनत व समर्पित भाव हवा. मैदानावर तासन्तास वेळ देण्याची तयारी हवी. खेळाप्रति प्रेम, प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा जपणारा खेळाडू आयुष्यात यशस्वी होतो.’स्पर्धा दुसऱ्याशी नव्हे तर स्वत:शी करा, असे सांगून लक्ष्मण म्हणाला,‘ खेळाडू जेव्हा स्वत:शी स्पर्धा करतो, तेव्हा सरस कामगिरी करण्याची भूक वाढीस लागते. खेळात यशोशिखर गाठायचे असेल तर प्रामाणिक मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही.’ विदर्भाच्या विविध संघांनी गतवर्षी केलेल्या चमकदार कामगिरीचे कौतुक करून त्याने व्हीसीएचे अभिनंदन केले.यावेळी व्हीसीएचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद जैस्वाल यांनी मागील वर्ष विदभार्साठी अविस्मरणीय व स्वप्नवत राहिल्याचे सांगून, खेळाडूंना समाधानी न राहता भविष्यात आणखी चांगल्या कामगिरीसाठी मेहनत करण्याचा सल्ला दिला. उपाध्यक्ष माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्य यांनीही कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले.गत मोसमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व संघांना लक्ष्मणच्या हस्ते ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात रजनीश गुरबानी, आदित्य ठाकरे, आदित्य सरवटे, अथर्व तायडे, यश राठोड, कोमल झंझाड आदींचा समावेश आहे. व्हीसीएतर्फे लक्ष्मणचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तरुण पटेल यांनी संचालन केले.

टॅग्स :Vidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशनCricketक्रिकेट