कोरोनाग्रस्त कुटुंबाला बहिष्कृत करू नका! महापौर जोशी यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 08:47 PM2020-03-17T20:47:03+5:302020-03-17T20:48:16+5:30

कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Don't exclude a coroner's family! A visit by Mayor Joshi | कोरोनाग्रस्त कुटुंबाला बहिष्कृत करू नका! महापौर जोशी यांनी घेतली भेट

कोरोनाग्रस्त कुटुंबाला बहिष्कृत करू नका! महापौर जोशी यांनी घेतली भेट

Next
ठळक मुद्देत्यांना गरज आहे तुमच्या मानिसक आधाराची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन महापौरसंदीप जोशी यांनी केले आहे.
संदीप जोशी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण ठरलेल्या व्यक्तीच्या घरी भेट दिली. बाधित व त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. या विषाणूसोबत नागपूरकर नीडरपणे लढा देत आहेत. आपणही घाबरु नका. चिंता करू नका. आम्ही सारे तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला. बाधिताशी चर्चा करून यापुढे आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन केले. कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे त्यांना आश्वस्त केले.
नागपुरात जो कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यांच्यावर दुर्दैवाने बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यांच्याकडे मोलकरीण नाही. आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सामाजिक बहिष्कार टाकल्यासारखे वागत आहेत, हे अयोग्य आहे. अशा परिवाराला काळजी घेत भेटल्यास आपल्याला कोणताही अपाय होणार नाही. परिवाराला धीर देणे, त्या परिवाराच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत महापौर या नात्याने आपण स्वत: या कुटुंबाला धीर देण्यासाठी आल्याची भावना संदीप जोशी यांनी व्यक्त केली. कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर, चिंता करू नका. संपूर्ण शहर आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांना दिला.
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. तो पसरू नये म्हणून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक घाबरल्याने तर काही ठिकाणी बेफिकीर होऊन वागत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याचा विचार करता जोशी यांनी मंगळवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे भेट देऊन रुग्णांकरिता असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली, उपाययोजनांचा आढावा घेतला. दोन्ही ठिकाणी प्रशासनाद्वारे जी व्यवस्था करण्यात आली आहे, त्याबद्दल प्रशंसा केली.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे, मेयोचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आदी उपस्थित होते. घाबरण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने बाधित असलेले रुग्ण गुन्हेगार नाहीत. कुणावरही ही वेळ येऊ शकते. त्यामुळे त्याची काळजी योग्यप्रकारे घ्यायला हवी. कोरोनाबाधित रुग्णाचा परिवार हा आपलाच परिवार असून, रुग्णांचे नातेवाईक हे देखील आपलेच नातेवाईक आहेत. त्यांना धीर द्या, असे आवाहन जोशी यांनी यावेळी केले.

Web Title: Don't exclude a coroner's family! A visit by Mayor Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.