राष्ट्रसंत निर्मित प्रार्थना मंदिर पाडण्याचे पाप करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST2021-01-03T04:11:07+5:302021-01-03T04:11:07+5:30
नागपूर : श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रतिनिधींनी नुकतेच पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक यांना निवेदन सादर केले. राष्ट्रसंत तुकडाेजी ...

राष्ट्रसंत निर्मित प्रार्थना मंदिर पाडण्याचे पाप करू नका
नागपूर : श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रतिनिधींनी नुकतेच पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक यांना निवेदन सादर केले. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांनी श्रमदानातून उभे केलेले गुरुकुंज माेझरी येथील प्रार्थना मंदिर ताेडण्याचे पाप करू नका, असे आवाहन त्यांना या निवेदनाद्वारे करण्यात आले.
राष्ट्रसंतांनी माेझरी येथे १९३५ साली गुरुदेव सेवाश्रमाची स्थापना केली व या माध्यमातून १९४० साली सर्वधर्म प्रार्थना मंदिराचे बांधकाम केले. हे मंदिर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद, डाॅ. राधाकृष्ण मेनन, डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, माेरारजी देसाई, जयप्रकाश नारायण या नेत्यांनी या प्रार्थना मंदिराला भेटी दिल्या आहेत. सर्वधर्मीय येथे प्रार्थना करू शकतात. त्यामुळे ते सामाजिक साैहार्द्र व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा वारसा स्थळाचे जतन करावे, अशी मागणी मंडळातर्फे करण्यात आली. ॲड. अशाेक यावले यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळात रूपराव वाघ, गुरुदेव मंडळाचे सचिव विठ्ठलराव पुनसे, सियाराम चावके, तनवीर अहमद, आनंद माथने, श्यामसुंदर आष्टीकर आदी सहभागी हाेते.