तोडू नको विश्वास, दे वचन हमखास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:41+5:302021-02-11T04:09:41+5:30

- आज प्रॉमिस डे : शपथ घेऊन तर बघा, बदलून जाईल आयुष्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शब्द देणे ...

Don't break faith, keep your word | तोडू नको विश्वास, दे वचन हमखास

तोडू नको विश्वास, दे वचन हमखास

- आज प्रॉमिस डे : शपथ घेऊन तर बघा, बदलून जाईल आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शब्द देणे आणि तो पाळणे, याला ऐतिहासिक महत्त्व आहे. शब्द देण्याची वृत्ती यालाच भारतीय भाषांत वचन, शपथ, प्रतिज्ञा, आन, इंग्रजित प्रॉमिस असे म्हटले जाते. मुळात ती एक निडर अशी भावना आहे, विश्वासाचे एक प्रतीक आहे. या एका भावनेने, विश्वासाने इतिहास घडविला आहे. प्रतिज्ञावंताचा आदर शत्रूही करतो आणि वचकून असतात. व्यवहारात असो वा युद्धभूमीवर किंवा प्रेमातही, वचन पाळण्याला क्षात्रतेजाची उपमा दिली जाते. क्षात्रतेज भाषा, जात, धर्म, देशाच्या बंधनात नाही तर हे बंधन तुमच्या कठोर असण्याचे प्रमाण आहे. प्रेमाळू अशा व्हॅलेंटाईन वीकमधील प्रॉमिस डे हा त्याच भावनेचे, वृत्तीचे कोमलतम कठोर बंधन तुम्हाला घालू पाहतो.

तर व्हॅलेंटाईन वीकमधील रोड, प्रपोज, चॉकलेट आणि टेडी डे नंतर येणारा पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे गुरुवारी येत आहे. नागपुरात हा प्रॉमिस डे सर्वांच्या आयुष्यात रोजच उगवतो आणि झोपी जाईपर्यंत तो मावळतोही. प्रत्येक शहरात कदाचित अशीच स्थिती असेल. इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नागपुरात तशी वर्दळ कमीच असते. तरीदेखील रोज सकाळी उठून व्यायाम करेन, ऑफिसला वेळेवर पोहोचेन, विशेषत: मैत्रिणी-मित्राला एखाद्या आनंदी बाबतीत शॉक्ड करेन आणि घरी लवकर जाऊन लवकर झोपी जाईन, असे वचन प्रत्येकजण स्वत:लाच देत असतो. ते वचन नागपूरकर पाळतात का, याचे मंथन प्रत्येकाने स्वत:च करावे. येथील प्रत्येकाच्या मनोविश्वावर वातावरणाचा प्रचंड परिणाम झालेला दिसतो. उन्हाळा, हिवाळा असो वा पावसाळा प्रत्येक ऋतू आकांडतांडव करणारा. असेच आकांडतांडव येथील प्रेमीयुगुलांमध्येही दिसून येतो. प्रॉमिस देताना झटकन आणि तोडताना पटकन, असा हा स्वभाव असतो. या प्रॉमिसचे हे दोन्ही पैलू अनेकांच्या नजरेस राजरोस पडतात, हे विशेष. मात्र, एक विशेष नागपुरात मृदू स्वभावीही असतात. वचन देऊन ते पाळताना आयुष्याला कलाटणी देणारेही अनेक उदाहरणे येथे सापडतील. मुळात वचन देण्याची भावना तुम्हाला सांगोपांग परिवर्तित करते. तुमच्या उग्रतेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच लक्ष्य गाठण्यास प्रेरित करते. मग ते करिअरचे असो वा आयुष्याच्या जोडीदाराचा विश्वास संपादन करण्याचे असो. तर द्याल ना वचन एकमेकांना हमखास विश्वासाचे.

..

Web Title: Don't break faith, keep your word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.