बालोद्यानने टाकली कात
By Admin | Updated: January 17, 2015 02:44 IST2015-01-17T02:44:38+5:302015-01-17T02:44:38+5:30
शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक असलेल्या सेमिनरी हिल्सवरील बालोद्यान कात टाकत आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांऐवजी आता नवीन खेळणी बदलविण्याचे ...

बालोद्यानने टाकली कात
नागपूर : शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक असलेल्या सेमिनरी हिल्सवरील बालोद्यान कात टाकत आहे. उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांऐवजी आता नवीन खेळणी बदलविण्याचे आणि रंगरंगोटी करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांसह पालकांची गर्दी सुद्धा वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर वन विभागाने बालोद्यानमध्ये नवीन खेळणी व इतर साहित्यासाठी डिसेंबरमध्ये ४० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)कडून निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. शहरातील मुलांसाठी खेळण्याच्या मैदानाची आवश्यकता लक्षात घेता डीपीसीने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी प्रदान केली होती. विभागीय कार्यालयातील सूत्रांनुसार नागपुरात केंद्र सरकारची एक सोसायटी कार्यरत आहे. या सोसायटीकडे खेळ साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सींची नोंदणी आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार रोखण्यासाठी संबंधित सोसायटीच्या माध्यमातून खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. निधी मिळताच येथील लहान मुलांच्या तुटलेल्या खेळणी बदलवून त्याजागी नवीन खेळणी बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच उद्यानाला आणखी सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)