दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 12:48 PM2020-08-04T12:48:33+5:302020-08-04T12:49:00+5:30

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही.

Doha-Sharjah awaits Bhivapuri Chili from Vidarbha | दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देएआयएटीसीएल भाज्या पाठविण्याच्या तयारीत

वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सौदी अरबमधील दोहा आणि शारजाहमध्ये विदर्भातील हिरव्या मिरचीची टंचाई जाणवायला लागली आहे. मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. त्यामुळे या नागरिकांना भिवापुरी मिरचीसोबतच अन्य भाज्यांचीही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस कतार आणि एअर अरेबियासाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही फ्लाईटमधून सुमारे तीन टन भाज्या पाठिवल्या जायच्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक प्रमाणात मिरची पाठविली जायची. या शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी, आवळा, भेंडी, टमाटर, कुंदरू, अद्रक, लसूण आदींचीही निर्यात केली जात असे.

शारजाहमध्ये उज्बेकिस्तान, युगांडा, तुर्की येथूनही भाज्यांची आयात केली जात असली तरी विदर्भातील हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याची माहिती आहे. सध्या ३१ आॅगस्टपर्यंत विदेशी विमान सेवेवर बंदी असली तरी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआईएटीसीएल) भाज्यांचे कार्गो करण्याच्या कामी लागली आहे.
कतार एअरवेज नागपूर ते दोहासाठी जाणाऱ्या एअर बसमध्ये सुमारे ५ टन भाज्या लोड केल्या जाऊ शकतात. नागपूर ते शारजाह दरम्यान उडणाºया अरेबियन फ्लाईटमध्येसुद्धा जवळपास एवढ्याच भाज्या लोड करता येतात.

मोबाईल व जनरल कार्गोसुद्धा
स्पाइसजेटचे एक फ्लाईटसुद्धा नागपूरवरून कार्गो फ्लाइटच्या रूपात नियमित सेवा देत आहे. रात्री ९.३० वाजता येणाºया या विमानात मोबाईल आणि जनरल कार्गो येतो. सुमारे तासाभराने ते नागपूरवरून कार्गो घेऊन रवाना होते.

 

Web Title: Doha-Sharjah awaits Bhivapuri Chili from Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.