कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:46 IST2025-03-21T12:45:43+5:302025-03-21T12:46:35+5:30

कुत्र्यांनी अक्षरश: लचके ताेडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथे गुरुवारी दुपारी घडली.

Dogs took the life of a toddler | कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव

कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव

हिंगणा/ गुमगाव : चार वर्षीय चिमुकली खेळत असताना एकटीच वेणा नदीच्या दिशेने गेली. त्यातच ती नदीच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडली. कुत्र्यांनी अक्षरश: लचके ताेडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव येथे गुरुवारी दुपारी घडली.

हर्षिता रामसिंग चौधरी (४, रा. गुमगाव, ता. हिंगणा) असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. हषिताचे आई, वडील मूळचे राजस्थानातील रहिवासी असून, ते कामानिमित्त हिंगणा तालुक्यात आल्याने गुमगाव येथील रेखा रामटेके यांच्याकडे सात वर्षांपासून किरायाने राहतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
 

Web Title: Dogs took the life of a toddler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा