शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले

By admin | Updated: July 15, 2014 01:11 IST

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. प्रशासनाने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा परिषद : दोन डॉक्टरांवर कारवाईनागपूर : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. प्रशासनाने अशा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांवर उपचार व्हावेत, अशी अपेक्षा असते. यासाठी डॉक्टरांनी मुख्यालयी वास्तव्यास असणे गरजेचे आहे. परंतु काही डॉक्टर मुख्यालयी वास्तव्य न करता खासगी व्यवसाय करतात. जि.प.सभेत सदस्यांनी अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्थायी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांना सेवेतून कमी केले, तर डॉ. गुणवंत पिसे यांची हिवराबाजार येथे बदली करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रात नियुक्ती असूनही अनेक डॉक्टर खासगी व्यवसाय करतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाही. या संदर्भातील तक्र ारींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)सेवा समाप्तीचा आदेश मागेमॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील ४५ कंत्राटी डॉक्टर सहभागी झाले होते. संपात सहभागी डॉक्टरांच्या सेवा समाप्तीचे आदेश शासनाने दिले होते. परंतु कारवाई टाळण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांनी सोमवारी जोंधळे यांची भेट घेतली. भविष्यात कोणत्याही संपात वा आंदोलनात सहभागी होणार नाही, असे लेखी हमीपत्र त्यांनी लिहून दिल्याने जोंधळे यांनी सेवा समाप्तीचे आदेश मागे घेतले.