शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे असहकार आंदोलन सोमवारपासून

By admin | Updated: May 24, 2014 01:03 IST

महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) मागण्यांना घेऊन शासनाने आश्वासन दिले होते. यामुळे संघटनेने २०११ पासून आंदोलनाला स्थगिती दिली होती,

सामूहिक राजीनामे देणार : मॅग्मोचा इशारा

नागपूर : महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) मागण्यांना घेऊन शासनाने आश्वासन दिले होते. यामुळे संघटनेने २०११ पासून आंदोलनाला स्थगिती दिली होती, परंतु शासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच पुन्हा वैद्यकीय अधिकार्‍यांनी सोमवार २६ मे पासून असहकार आंदोलन पुकारले आहे. राज्यभरात सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांची संख्या १२ हजार आहे तर विदर्भात साडेतीन हजार वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्याकडून येत्या २६ ते ३१ मे दरम्यान असहकार आंदोलन करण्यात येईल. अधिक माहिती देताना महाराष्टÑ राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांनी सांगितले. या दरम्यान सरकारला दर दिवसाला पाठविण्यात येणारा आरोग्याचा ताळेबंद माहिती (मेडिकल इन्फर्मेशन सिस्टिम) व बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येईल. १ जून ते ६ जूनपर्यंत बाह्यरुग्ण विभाग बंद करून फक्त आकस्मिक विभागात सेवा देण्यात येईल. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यास ७ जूनपासून आकस्मिक विभाग, शवविच्छेदन आणि एमएलसी केसेस पाहणे बंद करू. दुसर्‍या टप्प्यात सामूहिक रजा आणि शेवटच्या टप्प्यात सामूहिक राजीनामे देऊ. राज्यातील ८० टक्के जनता गावखेड्यात राहते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील सहाव्या वेतन आयोगामध्ये वेतनश्रेणीत वैद्यकीय अधिकार्‍यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांना दिलेल्या वेतनश्रेणीत प्रचंड तफावत आहे. केंद्र सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्‍यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसहित अनेक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले, परंतु आश्वासन पाळले नाही. यामुळे सर्व अधिकारी रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात हे असहकार आंदोलन पुकारणार आहेत. (प्रतिनिधी)