शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

डाॅक्टरच्या अंगरक्षकांची तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 12:14 AM

Doctor's bodyguards beat young manहाॅस्पिटलचे पूर्ण बिल दिल्यानंतरही डाॅक्टरने एक लाख रुपये उधार असल्याचे सांगून ती रक्कम बळजबरीने वसूल करायला सुरुवात केली. त्यासाठी डाॅक्टरने खासगी अंगरक्षक आणून तरुणास बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देअंगरक्षक पाेलिसांच्या ताब्यात : हाॅस्पिटलच्या बिलावरून वाद

लाेकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : हाॅस्पिटलचे पूर्ण बिल दिल्यानंतरही डाॅक्टरने एक लाख रुपये उधार असल्याचे सांगून ती रक्कम बळजबरीने वसूल करायला सुरुवात केली. त्यासाठी डाॅक्टरने खासगी अंगरक्षक आणून तरुणास बेदम मारहाण केली. त्यानंतर घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असलेल्या अंगरक्षकांना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना खापरखेडा येथे शुक्रवारी (दि. २५) घडली.

या प्रकरणात पाेलिसांनी लॉरेन्स सायमन, सागर राऊत व पीयूष शर्मा, तिघेही रा. नागपूर या खासगी अंगरक्षकांना ताब्यात घेतले आहे. सागर यादवराव गाेंडुळे (३०, रा. खापरखेडा, ता. सावनेर) याचा माेठा भाऊ बादल यास काेराेनाची लागण झाल्याने त्याने बादलला नागपूर शहरातील वंजारी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथील डाॅ. राेशन काेडमलवार यांनी त्याला ५० टक्के डिस्काउंट मिळवून देण्याची बतावणी करीत स्टार सिटी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्याची सूचना केली.त्याअनुषंगाने सागरने बादलला सिटी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. ताे बरा झाल्यावर सागरने हॅस्पिटलचे ३ लाख ७० हजार रुपयांचे बिले देऊन सुटी घेतली. यात त्याला काेणतेही डिस्काउंट देण्यात आले नव्हते. त्यातच डाॅ. काेडमलवार यांनी सागरला फाेन करून हाॅस्पिटलचे उधार असलेले एक लाख रुपये देण्याची सूचना केली. आपल्याकडे काेणतीही उधारी नसल्याचे सांगताच डाॅ. काेडमलवार त्यांच्या तीन खासगी अंगरक्षकांसह २७ मे राेजी खापरखेडा येथे आले.

त्यांनी सागरला खापरखेडा येथील रेल्वे क्राॅसिंगजवळ बाेलावून एक लाख रुपयांची मागणी केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या तिन्ही अंगरक्षकांनी सागरला चिचाेली मैदानावर नेले आणि तिथे बेदम मारहाण केली. त्यामुळे सागरने त्यांना ३० हजार रुपये दिले. त्यानंतर डाॅ. काेडमलवार यांनी सागरला मंगळवारी (दि. २२) पुन्हा फाेन करून उर्वरित ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांचे तिन्ही अंगरक्षक शुक्रवारी (दि. २५) सागरच्या घरी आले आणि त्यांनी रकमेची मागणी करीत सागरला जीवे मारण्याची धमकी दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी सागरचे घर गाठून तिन्ही अंगरक्षकांना ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणेदार भटकर यांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी सागर गाेंडुळे याच्या तक्रारीवरून भादंवि ३८६, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर