डॉक्टर, प्लीज कोट घाला...
By Admin | Updated: October 14, 2014 00:59 IST2014-10-14T00:59:49+5:302014-10-14T00:59:49+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट (अॅप्रॉन) घातलचा पाहिजे, अशी सक्ती नोव्हेंबर महिन्यांपासून होणार आहे.

डॉक्टर, प्लीज कोट घाला...
मेडिकलमध्ये आता तोंडी सूचना : पुढील महिन्यापासून अॅप्रॉनची सक्ती
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांनी पांढरा कोट (अॅप्रॉन) घातलचा पाहिजे, अशी सक्ती नोव्हेंबर महिन्यांपासून होणार आहे. आता फक्त ‘डॉक्टर, प्लीज कोट घालायला विसरू नका’ अशा तोंडी सूचना दिल्या जात आहेत.
एकीकडे पंचतारांकित, वातानुकूलित, चकचकीत खासगी इस्पितळांमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा इस्पितळात रु ग्णाला दाखल करणे म्हणजे एक मोठी आर्थिक आपत्ती. रुग्णाच्या कुटुंबाला प्रथम आजारपणातील असुरक्षितता, मानिसक तणाव, कर्जाचा ताण यामधून व नंतर सवलती व सूट मागण्याच्या लाचारीतून जावे लागत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे शासनाच्या उदासीनतेमुळे शासकीय रुग्णलयांची परिस्थिती भयंकर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मेयो व मेडिकल प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे मेडिकलच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी, मेडिकलच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे.
सध्याच्या स्थितीत रुग्णालयाचा वऱ्हांडा चकाचक झाला आहे. दुसरीकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी अपघात विभागामध्ये काही बदल करण्याचे काम हाती घेतले आहे. यात जुने अपघात विभागाला पुन्हा कार्यन्वित करून यात जखमी रुग्ण, मृतदेह आदींची तपासणी तर सध्या कार्यरत अपघात विभागात इतर गंभीर आजाराचे रुग्ण तपासले जाणार आहेत. यामुळे एकाच विभागात गर्दी कमी होऊन कामात सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. डॉ. निसवाडे रुग्णालयाच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी सर्व डॉक्टरांना पांढरा कोटाची सक्ती करणार आहेत, परंतु ही सक्ती १ नोव्हेंबरपासून असणार आहे. त्यापूर्वी त्यांना भेटणाऱ्या डॉक्टरांना ‘डॉक्टर, प्लीज कोट घालायला विसरू नका,’ ही सूचना देणार आहेत. (प्रतिनिधी)