शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर तुम्हीसुद्धा... सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले कसे ?

By योगेश पांडे | Updated: June 30, 2025 14:50 IST

Nagpur : उच्च शिक्षण आणि व्यावहारिक विवेकबुद्धी यांचा परस्पर संबंध कमी होत चालला आहे की काय?

योगेश पांडेनागपूर : सायबर गुन्हेगारांकडून केवळ मध्यमवर्गीयच नव्हे तर अगदी उच्चशिक्षितांनादेखील गंडा घालण्यात येत असल्याचे अनेक प्रकार दिसून येतात. मात्र, आता डॉक्टर मंडळी त्यांचे सॉफ्ट टार्गेट झाल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

'अॅडव्हान्स पेमेंट'च्या नावाखाली रामदास पेठ येथील डॉक्टर दाम्पत्याला ४ लाखांचा गंडा घातल्याची घटना ताजीच आहे. सोबतच एका डॉक्टरला तर गुंतवणुकीच्या बहाण्याने अलगदपणे सायबर गुन्हेगार 'मीना' आणि 'रिया' या तथाकथित तरुणींनी जाळ्यात ओढले व थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेचौतीस लाख रुपये उडवले. वैद्यकीय तज्ज्ञ वेगवेगळ्या आजारांवर औषधे देत रुग्णांना बरे करतात. मात्र, सायबर गुन्हेगारांच्या या 'व्हायरस'चे तेच शिकार होत असल्याने उच्च शिक्षण आणि व्यावहारिक विवेकबुद्धी यांचा परस्पर संबंध कमी होत चालला आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

नागपुरातील एका वैद्यकीय तज्ज्ञासोबत मागील महिन्यात हा प्रकार घडला. संबंधित डॉक्टरचे मध्य प्रदेशमध्ये मोठे सेटअप असून, नागपुरातदेखील ते राहतात. मध्य प्रदेशातील सेंटरमधून चांगली कमाई झाल्याने डॉक्टरला ते पैसे गुंतवायचे होते व त्यांनी गूगलमधून त्यासाठी 'इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म' पाहण्यास सुरुवात केली. इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली.

सातत्याने सायबर गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतानादेखील डॉक्टरने अनोळखी संकेतस्थळावर स्वतःची माहिती सबमिट केली. दोनच दिवसात मीना नावाच्या एका तथाकथिक गुंतवणूक तज्ज्ञ महिलेचा त्यांना फोन आला आणि डॉक्टरचे साडेचौतीस लाख रुपये त्यांच्या खिशातून जाण्याची प्रक्रिया आपसूकच सुरू झाली. 'रेटफिन इन्व्हेस्टमेन्ट प्रा. लि.या कंपनीचे नाव सांगत मीना व रिया नावाच्या तरुणींनी डॉक्टरला गुंतवणुकीच्या विविध स्कीम्स सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर बनावट आयपीओ अलॉटमेंटच्या नावाने डॉक्टरला साडेचौतीस लाख रुपये गुंतवायला लावले.

आश्चर्याची बाब म्हणजे एकदा तर आरोपींनी नऊ लाखांच्या ऐवजी २४ लाखांच्या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट झाले असून, जास्तीचे पैसे भरावे लागतील, अशी बतावणी केली.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम