शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 20:37 IST

सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टरने भूल देणाऱ्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देखिशात आढळली सुसाईड नोट

 नागपूर :

 सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खासगी ईस्पितळात सेवारत असलेल्या एका डॉक्टरने स्वतःला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी भल्या सकाळी ही घटना उघकीस आल्यानंतर शहरातील वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

डॉ. अभिजीत रत्नाकर धामनकर (वय ३९) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते राऊत चाैक लालगंजमध्ये राहत होते. सेंट्रल एव्हेन्यूवरील किमया हॉस्पिटलमध्ये ते सेवारत होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याने त्यांनी २०१७ मध्ये विशाखा गायकवाड यांच्याशी लग्न केले होते. त्यांना एक वर्षांचा मुलगा असल्याचे समजते. सासरच्यांची ढवळाढवळ वाढल्याने त्यांच्या घरातील वातावरण बिघडले होते. परिणामी घरगुती वादामुळे त्यांची पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे ते काही दिवसांपासून अस्वस्थ होते.

गुरुवारी त्यांची नाईट ड्युटी होती. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता ते कर्तव्यावर आले. भरती असलेल्या रुग्णांची तपासणी करून पहाटेच्या वेळी ते आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. एका रुग्णाची प्रकृती बिघडल्याने पहाटे ३ च्या सुमारास ईस्पितळातील नर्सने त्यांना रूममध्ये जाऊन आवाज दिले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नर्सने जवळ जाऊन बघितले. त्यांचा श्वासोश्वास आणि नाडी बंद पडल्यासारखी जाणवल्याने नर्सने ईस्पितळाच्या संचालकांसह अन्य डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतले. त्यांनी डॉ. अभिजीत यांना व्हेंटिलेटरवर ठेवून सुमारे तासभर कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलीस आणि डॉ. अभिजीत यांच्या नातेवाईकांना बोलवून घेण्यात आले. पहाटे ५ च्या सुमारास डॉ.अभिजीत यांना त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी मृत घोषित केले.

खिशात आढळली सुसाईड नोट

पोलिसांनी डॉ. अभिजीत यांच्या कपड्याची तपासणी केली. त्यांच्या खिशात एक नोट आढळली. त्यात त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले. सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे आणि तांबेबाई यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. गणेशपेठ पोलिसांनी डॉ. अभिजीत यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. संबंधितांची चाैकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर