शेतीसाठी मजूर देता का मजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:29+5:302021-01-13T04:18:29+5:30
भूषण सुके लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, किडी व राेगांचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणामुळे ...

शेतीसाठी मजूर देता का मजूर!
भूषण सुके
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, किडी व राेगांचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणामुळे पिकांची खुंटलेली वाढ यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. दुसरीकडे, मजुरीचे गगनाला भिडलेले दर व ऐनवेळी वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने एकीकडे शेतकरी मेटाकुटीस आले असून, दुसरीकडे उत्पादनखर्च वाढला आहे.
जिल्ह्यात यावर्षी कपाशी लागवड क्षेत्र वाढले आहे. सध्या कापसाच्या दुसऱ्या वेच्याची वेचणी सुरू आहे. चिकट्यामुळे कापूस वेचणीचा वेग मंदावला आहे. पूर्वी ८ ते १० रुपये प्रति किलाेप्रमाणे वेचला जाणारा कापूस आता २० ते २३ रुपये प्रति किलाे दराने वेचावा लागत आहे. मजुरांअभावी वेचणी शक्य हाेत नाही. कापूस वेचणी, पीक कापणी, निंदणासाठी दुसऱ्या जिल्हा व राज्यातून मजूर आणावा लागताे. त्यांच्या वाहतुकीचा खर्चही करावा लागताे. हरभरा, मिरची व इतर पिकांच्या मशागतीसाठी मजूर मिळेनासे झाले. ही समस्या साेडवायची कशी, हे सुचेनासे झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
...
काय म्हणतात शेतकरी
कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने अखेर कुटुंबीयांकडून कापूस वेचावा लागला. आपला कापूस लवकर वेचावा, यासाठी काहींनी वेचणीचे दर वाढविले आहेत. ही संधी साधून मजुरांनी वेचणीचे दर दुपटीने वाढविले. यंदा उत्पादनात घट आली आहे. त्यात मजुराच्या समस्येने शेतकरी त्रस्त झाला आहे.
- संजय रेवतकर, सावरगाव, ता. नरखेड
...
यंदा कापूस वेचणीसाठी प्रति किलाे ८ ते १० रुपये माेजावे लागते. पण, एक महिला दिवसभरात ७ ते ९ किलाे कापूस वेचते. त्यामुळे ही मजुरी परवडत नाही. मजूर मिळत नसल्याने वेचणी वेळेवर हाेत नाही. मजूरही मिळत नाही. ‘शेतकरी उपाशी व मजूर मात्र तुपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- मंगेश नारनवरे, इंदापूर, ता. भिवापूर
...
आमच्या भागात धानाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा काेराेनामुळे बाहेरील जिल्ह्यातील मजूर उपलब्ध झाले नाही. सध्या मिरची, भाजीपाला पिके आहेत. तुलनेने मजुरीचे दर वाढले आहेत. अधिक राेजंदारी देऊनही शेतकामाला मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची माेठी समस्या हाेते.
- धनराज झाडे, महादुला, ता. रामटेक
...
मजुरीचा दर
पाच वर्षापूर्वीचा दर
पुरुष मजूर : १५० रुपये
महिला मजूर : ८०-१०० रुपये
यंदाचा मजुरी दर
पुरुष मजूर : ३५० रुपये
महिला मजूर : २०० रुपये
....
यंत्राने होणारी कामे
यंत्राद्वारे पेरणी, पीक कापणी, मळणी, हंगामपूर्व व पिकांची आंतरमशागत केली जाते. फवारणी, रासायनिक खते देण्यासाठी यंत्रांचा वापर हाेताे.
....
कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा
मशागतीसाठी ट्रॅक्टर व त्याच्या विविध साधनांचा वापर केला जाताे. फवारणीसाठी पाॅवर स्प्रेअर व काही भागात ड्राेनचाही वापर हाेत आहे. कापूस वेचणीसाठी मशीनचा वापर केला जाताे. तसेच सूक्ष्म सिंचन साधनांद्वारे रासायनिक खते देण्यासाठी यंत्राचा वापर हाेत आहे. मजुरांअभावी शेतीक्षेत्रात दिवसेंदिवस आधुनिक यंत्रांचा वापर वाढत आहे.