शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा - शशांक मनोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:47 IST

नागपूर - ‘पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा, कामगिरी कराल तर पैसाच तुमच्यामागे धावेल. खेळावर ‘फोकस’केल्यास यश आणि ऐश्वर्य तुमचा पाठलाग करेल,’ असा मोलाचा सल्ला आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला. प्रसंग होता रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाच्या सत्कार सोहळ्याचा.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हील लाईन्सस्थित स्टेडियमच्या ...

नागपूर - ‘पैशामागे धावू नका, खेळावर फोकस करा, कामगिरी कराल तर पैसाच तुमच्यामागे धावेल. खेळावर ‘फोकस’केल्यास यश आणि ऐश्वर्य तुमचा पाठलाग करेल,’ असा मोलाचा सल्ला आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला. प्रसंग होता रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाच्या सत्कार सोहळ्याचा.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हील लाईन्सस्थित स्टेडियमच्या हिरवळीवर रंगलेल्या या सोहळ्यात ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार असलेल्या संघातील सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफला स्मृतिचिन्ह आणि तीन कोटींची रोख रक्कम मनोहर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मनोहर यांनी आयपीएल तुमचे अंतिम ध्येय नाही, हे डोक्यात ठेवून कामगिरी उंचावण्याचे आवाहन केले. मला राष्ट्रीय संघात खेळायचे आहे असे स्वप्न उराशी बाळगल्यास यश आणि ऐश्वर्याचे धनी व्हाल, असा सल्ला दिला. मनोहर पुढे म्हणाले, ‘कोच हा तुमच्या चुका सुधारतो. कोचच्या गोष्टी ऐका व त्यावर विचार करा. तुमचा ज्युनियर खेळाडूही कधीकधी मोलाचा सल्ला देऊ शकतो.’मुंबईकर सहसा कुणाला खपवून घेत नाहीत, असे नमूद करीत मनोहर म्हणाले, ‘मुंबईचे दोन खेळाडू होते म्हणून विदर्भ विजेता ठरला, अशी प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली. मुंबई संघात मुंबईचेच खेळाडू होते व कोचही त्यांचे होते, मग मुंबई का जिंकली नाही. आमच्या खेळाडूंचे यश तुम्हाला मान्य नसेल पण कामगिरीच्या बळावर विदर्भ जिंकला, हे सत्य नाकारता येणार नाही. मी टीव्हीवर कधीही आंतरराष्टÑीय सामना पाहात नाही, पण विदर्भाचा अंतिम सामना पूर्ण पाहिला. मी बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो. आयसीसी चेअरमन आहे पण विदर्भ माझे पहिले प्रेम आहे. गतवर्षी विदर्भ १६ वर्षे गटाचा संघ विजेता ठरला होता.’ 

टॅग्स :Cricketक्रिकेटVidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशनRanji Trophyरणजी करंडक