शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मधुमेहाची राजधानी होऊ देऊ नका : विकास आमटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 8:52 PM

देशात कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न होत असतानाही प्रत्यक्षात तो वाढत आहे. हीच स्थिती मधुमेहाची आहे. यामुळे कुष्ठरोगासोबतच मधुमेहाची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळीच निदान होऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. देशाला मधुमेह आणि कुष्ठरोगाची राजधानी होऊ देऊ नका, असे आवाहन महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी येथे केले.

ठळक मुद्देएडेकॉन-२०१८ कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न होत असतानाही प्रत्यक्षात तो वाढत आहे. हीच स्थिती मधुमेहाची आहे. यामुळे कुष्ठरोगासोबतच मधुमेहाची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळीच निदान होऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. देशाला मधुमेह आणि कुष्ठरोगाची राजधानी होऊ देऊ नका, असे आवाहन महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी येथे केले.असोसिएशन आॅफ डायबेटिज एज्युकेशन व डायबेटिज फाऊंडेशन आॅफ इंडियातर्फे रविवारी रामदासपेठेत आयोजित ‘एडेकॉन-२०१८’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, मधुमेहतज्ज्ञाच्या राष्ट्रीय संघनटेचे अध्यक्ष डॉ. एच.बी. चंडालिया, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, संस्थेचे संचालक डॉ. सुनील गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता गुप्ता उपस्थित होते.डॉ. आमटे म्हणाले, आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात कुष्ठरुग्ण दिसत नाही. कुष्ठरोगावर उपचार उपलब्ध असूनही तो समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. याउलट स्थिती मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत आहे. मधुमेही रुग्णांना समाज आपलेसे करतो. यातील एक आजार शरीराला पोखरतो तर दुसरा मनाला पोखरतो. आज प्रत्येक वयोगटात मधुमेह दिसतो. ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.संचालन डॉ. सरिता उगेमुगे यांनी केले. कविता गुप्ता यांनी आभार मानले. या कार्यशाळेत देशभरातून ४५०वर डॉक्टर सहभागी झाले होते. मधुमेहीग्रस्तांच्या उपवासाला घेऊन चार चमूमध्ये झालेला वादविवाद हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य ठरले.

सातपैकी एक गर्भवती मधुमेहाने प्रभावित-डॉ. गुप्ता‘इंटरनॅशनल डायबिटिज फेडरेशन’ने (आयडीएफ) २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासात गर्भावस्थेतील १६.२ टक्के महिलांना मधुमेहाचे लक्षणे दिसून आलीत. ज्या महिलांना गर्भावस्थेत मधुमेह होतो. त्यातील ५० टक्के महिलांचा मधुमेह हा पाच ते दहा वर्षानंतर ‘टाईप-दोन’मध्ये रूपांतरित होतो. यात ३० वर्षांच्या आतील महिलांची संख्या मोठी आहे. सातपैकी एक गर्भवती महिला मधुमेहान प्रभावित आहे, अशी माहिती डायबिटिज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्ण संख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्य