शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा, पक्षशिस्त असलीच पाहिजे ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खडेबोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:30 IST

माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा. माझ्याकडे येऊन करा. आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा. निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला'', असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले. 

नागपूर - ''विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा. माझ्याकडे येऊन करा. आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा. निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला'', असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले. 

नांदेड महापालिकेतील विजयानंतर खा. अशोक चव्हाण यांचे सोमवारी (16 ऑक्टोबर) सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्यासोबत ते यवतमाळसाठी रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना चव्हाण पक्षांतर्गत गटबाजीवर कटाक्ष केला. 

काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत काही नेत्यांनी दिल्लीत त्यांची तक्रार केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी स्वत: गट-तट मानत नाही. पक्षांतर्गत बाबींवर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मी पदावर असेपर्यंत पक्ष बळकट करण्यावरच भर देणार. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. मला निकालात रस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई महापालिकेत नगगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. भाजपाने देशभरात सत्तेसाठी पळवापळवीचे उद्योग केले. पक्षांतर बंदी कायदा तर धुडकावून लावला. आता तेच शिवसेना करीत आहे. हे प्रकार लोकशाहीसाठी मारक आहेत. अजित पवार यांनी केलेल्या प्रशंसोबत विचारले असता ते म्हणाले, माझ्या मंत्रीमंडळात पवार हे मंत्री होते. भाजपाचा सफाया झाल्याचा त्यांना आनंद झाला आहे. ही चांगली बाब आहे.

''नागपुरात नेत्यांचे समीकरण बसवणार'' नागपुरातही नेत्यांचे समीकरण बसविता आले असते तर मला अधिक आनंद होईल. गरज भासली तर त्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे. मला कुणालाही प्रमोट करायचे नाही किंवा कुणाचीही बाजू घ्यायची नाही. नागपुरात गटबाजीचा इतिहास फार जुना आहे. कोणत्याही प्रदेशाध्यक्षासाठी हे काही नवीन नाही. कुणाची नाराजी असेल तर त्यांनी आपल्याशी चर्चा करावी. आपण चर्चेला सदैव तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

''भाजपाचा परतीचा प्रवास सुरू''  गेल्या निवडणुकीच्या वेळी देशात मोदी लाट होती. भाजपाने केलेल्या अपप्रचाराला व दिलेल्या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली. मात्र, आता काँग्रेस बरी असल्याची जाणीव लोकांना झाली आहे. नांदेड, गुरुदासपूरच्या निकालाने लोकांना काँग्रेसकडून अपेक्षा असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भाजपाचा सामना करण्यासाठी काँग्रेसला जोरात तयारी करावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, महागाई आदी मुद्यांवर जनता सामान्य जनता त्रस्त आहे. ज्या गुजरातने भाजपाला डोक्यावर घेतले होते तेथील व्यापारी आता रस्त्यावर उतरले आहेत. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. 

''आणीबाणी लावण्याचा प्रयत्न'' सोशल मीडियाला हाताशी धरून भाजपा सत्तेवर आली. आता तेच हत्यार त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर बंदी घालून अप्रत्यक्षपणे आणीबाणी लावण्याचे प्रयत्न होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.  

नागपुरात जंगी स्वागतप्रदेशाध्यक्ष खा. अशोच चव्हाण यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या वेळी चव्हाण यांचा जयघोष करण्यात आला. अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, मुन्ना ओझा, उमाकांत अग्नीहोत्री, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, दीपक वानखेडे, गिरीश पांडव, राकेश पन्नासे, कमलेश चौधरी, बंटी शेळके, विवेक निकोसे, आकाश तायवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर चव्हाण रवि भवन येथे आले असता तेथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मॉर्निंग वॉक क्लब व ज्येष्ठ नागरिक मंडळानेही काँग्रेसच्या विजयासाठी चव्हाण यांचे स्वागत केले. इतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण