शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

डीजे मालकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By सुनील चरपे | Updated: September 11, 2022 19:04 IST

धारदार शस्त्राने वार करताच मित्रांनी काढला पळ.

नागपूर : डीजेचा मालक त्याच्या दाेन मित्रांसाेबत दुचाकीने जात असताना माेटरसायकलवर आलेल्या दाेघांनी त्यांना वाटेत अडविले. त्या दाेघांनी डीजे मालकावर धारदार शस्त्राने वार करताच त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. या हल्ल्यात डीजे मालकाचा मृत्यू हाेताच हल्लेखाेर तिथून पळून गेले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान-बाेर्डा मार्गावर शनिवारी (दि. १०) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

कल्पेश भगवान बावनकुळे (२८, रा. बनपुरी-साटक, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. कल्पेश डीजेचा व्यवसाय करताे. त्याने शनिवारी नागपूर शहरातील ऑर्डर पूर्ण केल्यानंतर मित्र सूरज ढोबळे व जितेंद्र ढोबळे याच्यासाेबत एमएच-४९/बीएल-५६२८ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने नागपूरहून कन्हान मार्गे बनपुरीला जात हाेता. 

तिघेही कन्हान-बाेर्डा मार्गावरील एका पेट्राेलपंपजवळ पाेहाेचताच माेटरसायकलवर आलेल्या अनाेळखी दाेघांनी त्या तिघांना अडवले. त्यामुळे तिघेही राेडवर काेसळले. त्या दाेघांनी काही कळण्याच्या आत कल्पेशला पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. भीतीमुळे सूरज व जितेंद्रने ॲक्टिव्हा साेडून तिथून लगेच पळ काढला. ताे खाली काेसळताच दाेघे पळून गेले. यात गंभीर व खाेलवर जखमा झाल्याने कल्पेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरDeathमृत्यू