शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येणे मोठ्या आजाराचे लक्षण

By admin | Updated: February 8, 2015 01:15 IST

हृदयासंबंधीचे आजार बळावले आहेत. साधारण ४० टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. यामुळे चक्कर येणे, क्षणमात्र बेशुद्ध होणे हा आजार नसला तरी, एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.

मार्टिन ग्रीन : ‘इसेकॉन-२०१५’ परिषदेला सुरुवात नागपूर : हृदयासंबंधीचे आजार बळावले आहेत. साधारण ४० टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. यामुळे चक्कर येणे, क्षणमात्र बेशुद्ध होणे हा आजार नसला तरी, एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. म्हणून रुग्णाला चक्कर येण्यामागची कारणे डॉक्टरांनी शोधून काढली पाहिजेत, असा सल्ला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त कॅनडा येथील ओरावा हार्ट इन्स्टिट्यूटचे मेडिसीन विषयाचे प्राध्यापक डॉ. मार्टिन ग्रीन यांनी येथे दिला. इंडियन सोसायटी आॅफ इलेक्ट्रोकार्डिओलॉजी या संस्थेच्यावतीने ईसीजीवर राष्ट्रीय परिषद ‘इसेकॉन -२०१५’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आज शनिवारी उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आयोजित ‘सीनकोप : वेन टू वरी?’ या विषयावर ते बोलत होते. चक्कर येणे हा हृदयासंबंधीचा आजार असू शकतो, असे म्हणत डॉ. ग्रीन यांनी चक्कर येण्यामागच्या कारणांचा शोध कसा घ्यावा, त्याची तपासणी कशी करावी व औषधोपचार कसा करावा, यासंबंधी विशेष मार्गदर्शन केले. हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर काय करावे, या विषयावर डॉ. एच. राव यांनी मार्गदर्शन केले. बंद पडलेल्या हृदयावरील उपचार पद्धती, हृदयाला सुरळीत गती आणण्यासाठीच्या उपचारांची माहितीही त्यांनी दिली. दिवसभर चाललेल्या परिषदेत ईसीजीसारख्या सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करून हृदय रोगाचे निदान व त्यावरील उपचार पद्धती, हृदयाच्या स्पंदनाचे विविध आजार व हृदयक्रिया बंद पडणे यावरील नवनवीन अद्ययावत संशोधन यावर चर्चा घडून आणली. वैद्यकीय अध्यापन क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर व मेडिसीन विषयावरील प्राध्यापक डॉ. गोपाल दुबे, डॉ. एस.एम. पाटील व डॉ. आर.जी. सालकर यांचा सत्कार करून परिषदेची सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. बी.जी. वाघमारे, डॉ. पुष्पा जगताप व डॉ. खलील उल्ला यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात ‘ईसीजी लर्निंग’ यावरील सीडीचे लोकार्पण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. उदय माहोरकर यांनी केले. आभार परिषदेच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. प्रशांत जगताप यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजश्री खोत, डॉ. सुरेंद्र सूर्यवंशी, डॉ. अनिल मोडक, डॉ. कळमकर व डॉ. विनोद खंडाईत परिश्रम घेत आहेत.(प्रतिनिधी)