शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

दिवाळी फराळ २०१८; विदर्भातले पारंपारिक रोडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 10:24 IST

खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ.

ठळक मुद्देहिवाळ्यातला चविष्ट गुणकारी ठेवा

अस्मिता कोठीवानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: खवैय्ये आणि खिलवैय्ये अशी ज्यांची ख्याती आहे, त्या वैदर्भियांचा रोडगा हा दिवाळीतला एक महत्त्वाचा आवडता खाद्यप्रकार. रोडगा हा नावानुसारच दिसायला रांगडा दिसणारा पदार्थ. पण अत्यंत गुणकारी. तो पचायला हलका, कफकारक, बलदायक, अग्निदीपक, सर्दी-खोकला नाशक असा अनेकविध गुणांनी युक्त. दिवाळीच्या सुमारास फक्त संध्याकाळी-रात्री पडणाऱ्या थंडीने गारठलेल्या किंवा सर्दाळलेल्या नागरिकांना पुढील हिवाळ्यात औषधी साथ देणारा एक पदार्थ. याचे महत्त्व इतके की, देवीच्या आळवणीतही त्याची वर्णी लागलेली आहे. सासुरवाशिणी देवीची आराधना करताना, तिने आपल्याला लवकर आशीर्वाद द्यावा यासाठी रोडग्याचा नैवैद्य दाखवतात. विशेष म्हणजे देवीच्या आरतीमध्येही त्याचा समावेश केला जातो. जसे, सत्वर पाव गे मला, भवानीआई रोडगा वाहीन तुला...तर असा हा रोडगा दिवाळीच्या दिवसापासूनच घरोघरी बनविला जाऊ लागतो. याला रोडगा किंवा पानगे असे म्हटले जाते.रोडग्याची पाककृतीसाहित्य-गव्हाचे पीठ, तेल, मीठ, गूळ व साजूक तूप.रोडगे भाजण्यासाठी गोवऱ्या.कृती- गव्हाच्या पीठात मीठ व मोहन घालून ते घट्ट भिजवावे. अर्धा तास ती झाकून ठेवावी. नंतर हव्या तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. एकेका गोळ्याला वाटीसारखे थोडेसे खोलगट करून त्याला तेल लावावे. त्यावर थोडे कोरडे पीठ भुरभुरावे. असे तीन गोळे एकावर एक ठेवून त्याचा एक चपटा जाडसर गोळा तयार करावा.अंगणात गोवऱ्या पेटवून त्याचा जाळ विझला की त्या गरम विस्तवात हे गोळे दाबून ठेवावे. थोड्यावेळ ते राखेतच राहू द्यावे. अर्ध्या-पाऊण तासात ते चांगले शिजतात. वरून दिसताना खमंग दिसू लागतात. गोळे थोडे थंड झाले की बाहेर काढून स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. मग हा रोडगा फोडून त्यावर कढवलेले तूप घालावे व झाकून ठेवावे.ताटात वाढताना रोडगा, तुरीच्या डाळीचे घट्ट वरण, वांग्याची किंवा लाल भोपळ्याची भाजी वाढावी. रोडग्यासोबत गूळ आणि तूपही आवडीने खाल्ले जाते.काही ठिकाणी या रोडग्यांचा बारीक चुरा करून त्यात गूळ व तूप घालून त्याचे पुन्हा छोटे छोटे लाडू वळतात.अतिशय चविष्ट, गुणकारी व दीर्घकाळ टिकू शकणारा हा पदार्थ दिवाळीची रंगत अजूनच वाढवतो.

टॅग्स :Diwaliदिवाळी