शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’चे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 10:35 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या वितरणाचा दुसरा सोहळा बुधवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे होत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉक्टर्स होणार सन्मानित

नागपूर :लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या वितरणाचा दुसरा सोहळा बुधवारी (दि. ४) दुपारी ४ वाजता हॉटेल सेंटर पॉइंट येथे होत आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समारंभाचे मुख्य अतिथी असून, लोकमत एडिटोरियल ग्रुपचे चेअरमन व राज्यसभा सदस्य (१९९८-२०१६) विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या निमित्त मुंबईतील ख्यातनाम फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांचे ‘आजची जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विदर्भातील नामवंत डॉक्टर आणि समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

अवॉर्डच्या अंतिम ज्युरी बोर्डाची बैठक रविवारी, १ मे रोजी पार पडली. यात सदस्यांनी विस्तृत चर्चा करून नामनिर्देशित व्यक्तींचे मूल्यांकन केले व त्यानंतर पुरस्कार विजेत्यांची निवड केली होती. ज्युरींमध्ये ज्युरी बोर्डाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ फिजिशियन डॉ. एस. एन. देशमुख, सचिव आणि ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, वरिष्ठ ईएनटी, हेड ॲण्ड नेक सर्जन डॉ. मदन कापरे, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख, ज्येष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार, ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. साधना देशमुख, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, अकादमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, जगप्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर सुनील जोशी यांच्यासह लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक सहभागी होते.

लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर पुरस्कार डॉक्टरांना कामगिरीच्या आधारे दिले जातात. वैयक्तिक कामगिरीच्या आधारे ही निवड केली जाते. तसेच मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे जनमताचा कौलही घेतला जातो.

जीवनगौरव पुरस्कार, यंग अचिव्हर्स अवॉर्ड या पुरस्कारांचा यात सहभाग असून, यावर्षी नव्याने तीन अवॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. यात आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड, कोविड वॉरिअर्ससाठी विशेष अवॉर्ड आणि विशेष ज्युरी अवॉर्डसह सार्वजनिक आरोग्यातील उत्कृष्ट योगदानाचा समावेश आहे.

वैद्यकीय व्यवसाय हा अत्यंत पवित्र व्यवसाय असून, तो मानवी मूल्यांशी खोलवर जडलेला आहे. या व्यापक क्षेत्रात सेवारत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांचे मोठे योगदान आहे. यामुळेच लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्सच्या निमित्ताने लोकमत मीडियाने वैद्यकीय क्षेत्रातील सेवारतांच्या सन्मानासाठी हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिकLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस