दुर्धर आजारग्रस्त बालकांना पोषण आहाराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:08 IST2021-01-21T04:08:51+5:302021-01-21T04:08:51+5:30

नागपूर : मानव विकास संस्था व पीएचएफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील अतिदुर्धर आजारग्रस्त बालकांना संस्थेच्या ...

Distribution of nutritious food to critically ill children | दुर्धर आजारग्रस्त बालकांना पोषण आहाराचे वितरण

दुर्धर आजारग्रस्त बालकांना पोषण आहाराचे वितरण

नागपूर : मानव विकास संस्था व पीएचएफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील अतिदुर्धर आजारग्रस्त बालकांना संस्थेच्या कार्यालयात पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्राचार्य सुरेंद्र मोरे, डॉ. संजय टेकाडे, अ‍ॅड. प्रकाश राऊत, अशोक लंगडे, नारायण पाचपोर यांनी बालकांशी संवाद साधला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ जोध, संचालक मृणमयी जोध, कार्यालयीन प्रकल्प संचालक आशा मेनन, मोनिका फुलमाळी, ज्योती कडवे, प्रभा कोठे, अश्विन नाईक व पालक उपस्थित होते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. हाताला काम नसल्यामुळे जीवन जगणे असह्य झाले. त्यात ज्यांची अपत्ये अतिदुर्धर आजाराने ग्रस्त आहेत त्या पालकांवर आभाळ कोसळले, त्यांना संस्थेच्या वतीने आधार देण्यात येत आहे.

Web Title: Distribution of nutritious food to critically ill children