विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:08 IST2021-01-09T04:08:10+5:302021-01-09T04:08:10+5:30
काटाेल : सामजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था (बार्टी)च्यावतीने काटाेल शहरात शहरात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात हाेतकरू व ...

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
काटाेल : सामजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था (बार्टी)च्यावतीने काटाेल शहरात शहरात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात हाेतकरू व गरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. ती मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी यासाठी बार्टीच्यावतीने हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती समतादूत जी. एम. शेख यांनी दिली. सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अतिथींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. पेन, नाेटबुक वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला हाेता. याप्रसंगी नीता बालपांडे, रिमा नितिकेश, सलोनी रेवतकर, गौरी सहारे, ज्ञानेश्वरी मडके, अनुष्का सोनवणे, प्रीती सोनवणे, नेहा पांडे यांच्यासह शेतकरी महिला उपस्थित होत्या.