शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

नागपुरातील  झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:47 PM

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडपपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : मिशन मोडवर प्राधान्य देण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागाने मिशन मोडवर या कामाला सर्वोच्च प्राधान्य देतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील अडीच हजार झोपडपपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.हैदराबाद हाऊस सभागृहात दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात शुक्रवारी पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पारपडली.त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र्र सिंह, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, प्रा. राजीव हडप, विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी मनिषा जायभाय, नागपूर सुधार प्रन्यासचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, झोपडपट्टी विकास प्रकल्प अधिकारी डी.डी. जांभुळकर, प्रकल्प सल्लागार लिना बुधे उपस्थित होते.नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून त्यापैकी २९३ घोषित झोपडपट्ट्या आहेत. यापैकी १५ महानगरपालिकेच्या, ५२ नागपूर सुधार प्रन्यासच्या तर २२६ राज्य शासनाच्या व खासगी तसेच इतर विभागाच्या जागेवर वसलेले आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात ६७ झोपडपट्ट्या असून यापैकी ४३ झोपडपट्ट्या शासनातर्फे घोषित आहेत.मनपाच्या जागेवरील ४ झोपडपट्यांमध्ये १७१९ पट्टेधारक असून यामध्ये तकीया धंतोली, फकीरनगर, रामबाग आदी वस्त्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिर लावून संपूर्ण प्रक्रिया १५ आॅगस्ट पूर्वी पूर्ण करावी. नासुप्रच्या जागेवर ५ झोपडपट्ट्या असून यातील सुमारे १५१२ पट्टेधारकांना पहिल्या टप्प्यात प्रक्रिया पूर्ण करावी, असेही यावेळी सांगितले.शासनाच्या जागेवर असलेल्या १० झापेडपट्ट्याध्ये राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ही जागा महसूल विभागाकडून महानगरपालिकेला हस्तांतरित करावी. तसेच २४ झोपडपट्ट्या अद्याप घोषित झालेल्या नसल्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन झोपडपट्टी घोषित करण्यासाठी शासनाकडे येत्या आठ दिवसात प्रस्ताव तयार करावा.दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जाटतरोडी, बोरकर नगर, इंदिरानगर जाटतरोडी, कुंदनलाल लॉयब्ररीच्या मागे बोरकर नगर, काफला वस्ती, टिंबर मार्केट, शिफर कॉलोनी, इमामवाडा, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, पवारटोली (दीक्षाभूमी), कैकाडी नगर, परसोडी, कामगार कॉलोनी व संत तुकडोजी नगर आदी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना केली.------------------

टॅग्स :nagpurनागपूरHomeघर