गुजरी हटविण्यावरून भाजीपाला विक्रेत्यांची मतमतांतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST2021-08-25T04:12:30+5:302021-08-25T04:12:30+5:30

भिवापूर : १० फुटाच्या मुख्य मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांची दैनिक गुजरी भरत असल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे ही गुजरी ...

Disputes of vegetable sellers over deletion of gujri | गुजरी हटविण्यावरून भाजीपाला विक्रेत्यांची मतमतांतरे

गुजरी हटविण्यावरून भाजीपाला विक्रेत्यांची मतमतांतरे

भिवापूर : १० फुटाच्या मुख्य मार्गावर भाजीपाला विक्रेत्यांची दैनिक गुजरी भरत असल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. त्यामुळे ही गुजरी इतरत्र हलविण्याबाबत काहींनी मागणी केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी नगर पंचायतमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र यात व्यापारी, नागरिक व लोकप्रतिनिधींचे वेगवेगळी मतमतांतरे असल्यामुळे आता पुढील निर्णय प्रशासकांपुढे ठेवण्यात आला आहे.

‘१० फुटांच्या मुख्य मार्गावर भरतो समस्यांचा बाजार’ या शीर्षकाखाली लोकमतने १२ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर स्थानिक प्रमोद गोजे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शहरात स्वाक्षरी मोहीम राबवून ही गुजरी स्थानिक विठ्ठल मंदिर परिसरात स्थलांतरित करण्याच्या मागणीबाबत मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांना निवेदन दिले होते. त्याच आधारावर मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी मंगळवारी नगर पंचायतीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात काहींनी ही गुजरी विठ्ठल मंदिर देवस्थान परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी केली. तर काहींनी ही गुजरी प्रत्येकी दोन दिवस याप्रमाणे शहरातील तीन भागात भरविण्याच्या सूचना केल्या. तर काहींनी आहे त्याच ठिकाणी गुजरी कायम ठेवून वाहतुकीचा खेळखंडोबा थांबविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. उपस्थितांमध्ये वेगवेगळी मतमतांतरे असल्यामुळे मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी या सर्व बाबी प्रशासकांपुढे मांडून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण नागरीकर, मीनाक्षी उमरेडकर, निशा जांभुळे, लव जनबंधू, कैलास कोमरेल्लीवार, प्रमोद रघुशे, अनिल समर्थ, दिनेश रामटेके, विजय हेडाऊ, सुनील मैदिले, जयंत उमरेडकर, तुषार चिचमलकर, रमेश बोराडे आदी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा आवश्यक

सध्या ज्या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांची दैनिक गुजरी भरत आहे, ते ठिकाण शहराचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे शहरवासीयांना सोयीचे ठरते. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करून आहे त्याच ठिकाणी दैनिक गुजरी ठेवल्यास योग्य ठरेल. दुसरीकडे स्थलांतरण करायचे झाल्यास त्या ठिकाणी आधी पायाभूत सुविधांची निर्मिती होणे आवश्यक आहे, असा सूर अभिव्यक्त होत आहे.

240821\2013-img-20210824-wa0073.jpg

आयोजीत बैठकीत मुख्याधिकारी सुवर्णा दखने व इतर

Web Title: Disputes of vegetable sellers over deletion of gujri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.