किरकोळ कारणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:08 IST2021-09-21T04:08:29+5:302021-09-21T04:08:29+5:30

नागपूर - किरकोळ कारणावरून वाद घालून मारहाण केल्याच्या वेगवेगळ्या घटना आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. नीलेश गुलाबराव फुलमाळी ...

Disputes for petty reasons | किरकोळ कारणावरून वाद

किरकोळ कारणावरून वाद

नागपूर - किरकोळ कारणावरून वाद घालून मारहाण केल्याच्या वेगवेगळ्या घटना आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.

नीलेश गुलाबराव फुलमाळी (वय ४०, रा. जरीपटका) हे त्यांच्या दुचाकीने शनिवारी रात्री ७.१५ च्या सुमारास घराकडे जात होते. अचानक दोन आरोपी त्यांच्याजवळ आले आणि दुचाकी चांगली चालव असे म्हणत त्यांना शिवीगाळ करू लागले. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाकडी दांड्याने डोक्यावर मारून फुलमाळी यांना जबर जखमी केले. आरडओरड ऐकून बाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. जखमी फुलमाळी यांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

रिक्षाची हवा सोडल्यावरून वाद

रिक्षाची हवा सोडल्याच्या संशयावरून सचिन मनोहर राऊत (वय ३५, रा. आदिवासीनगर, हुडकेश्वर) यांच्याशी शनिवारी रात्री १० च्या सुमारास आरोपी शेखर महादेवराव पडोळे (वय ३८)यांनी वाद घातला आणि हातबुक्कीने मारहाण केली. सचिन यांचे वृद्ध वडील वाद सोडवायला आले असता आरोपी पडोळेने लाकडी फळीने त्यांना बेदम मारहाण केली. त्याचवेळी आरोपी सचिन राऊत यांनी रिक्षावर काठी आपटली अन् वाद घालून पडोळेला मारहाण केली. दोघांनीही एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Disputes for petty reasons