दुकान लावण्यावरून वाद; चौघांचा हल्ला
By Admin | Updated: June 3, 2014 02:57 IST2014-06-03T02:57:48+5:302014-06-03T02:57:48+5:30
भाजीबाजारात दुकान लावण्याच्या वादातून चौघांनी एकावर प्राणघातक हल्ला चढवला.

दुकान लावण्यावरून वाद; चौघांचा हल्ला
नागपूर : भाजीबाजारात दुकान लावण्याच्या वादातून चौघांनी एकावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे राजा चोरमारे (वय ३५) हा तरुण गंभीर जखमी झाला. जयताळा बाजारातील पिक अँन्ड सॅन कॉन्व्हेंटजवळ रविवारी रात्री ८.३0 वाजता ही घटना घडली. भाजीच्या दुकानाच्या जागेवरून आरोपी आकाश आणि बाल्यासोबत राजा चोरमारेचा अनेक दिवसांपासून वाद होता. सोमवारी रात्री पुन्हा ते समोरासमोर आले. त्यामुळे त्यांच्यातील वाद पेटला आणि आकाश, बाल्या तसेच त्यांच्या दोन साथीदारांनी चोरमारेवर हल्ला चढवला. लोखंडी सळाखीने डोक्यावर मारल्यामुळे चोरमारे गंभीर जखमी झाला. त्याला पडोळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कमल संतोष गांधी (वय ३५, रा. गुजरवाडी) यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)