विश्वस्तांनाच बरखास्त करा
By Admin | Updated: June 1, 2014 01:04 IST2014-06-01T01:04:36+5:302014-06-01T01:04:36+5:30
नासुप्रचा लाचखोर निलंबित अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी विश्वस्तांनी पायघड्या घातल्या आहेत. हा प्रयत्न हा निश्चितच संशयास्पद असून संतापजनक आहे.

विश्वस्तांनाच बरखास्त करा
नासुप्रविरोधात नागरिक संतप्त : लाचखोर वासवानीसाठी पायघड्या
नागपूर : नासुप्रचा लाचखोर निलंबित अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी विश्वस्तांनी पायघड्या घातल्या आहेत. हा प्रयत्न हा निश्चितच संशयास्पद असून संतापजनक आहे. नासुप्र विश्वस्तांना एका लाचखोर अधिकार्याचा एवडा कळवळा आला असेल तर विश्वस्तांनाच बरखास्त केले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातील सर्वच स्तरातून उमटली आहे.
सात वर्षांंपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेला नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी याच्या सेवानवृत्तीला तीन महिने शिल्लक राहिले असताना त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी नासुप्र विश्वस्तांनी ठराव संमत केला आहे. लोकमतने शनिवारी ‘वासवानी नासुप्रचा जावई आहे का? या मथळ्याखाली विशेष लेख प्रसिद्ध करीत या प्रकाराला वाचा फोडली. त्यात लाचखोर वासवानीबाबत विश्वस्तांना एवढा कळवळा का ? असा प्रश्न उपस्थित केला. याविरुद्ध गांधीगिरी करीत आंदोलन करण्याचे आवाहन केले. लोकमतच्या या विशेष लेखाची नागपूरकरांनी गंभीर दखल घेतली. आज नासुप्रसह शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय वतरुळात याची एकच चर्चा होती. लोक या प्रकारावर संताप व्यक्त करीत होते. सामान्यांच्या मनातील प्रश्नाला लोकमतने नेहमीप्रमाणेच वाचा फोडल्याबद्दल अनेकांनी लोकमतचे अभिनंदनही केले. बर्याच संस्था, संघटनांनी विश्वसांच्या या भूमिकेविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला असून काहींनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तर आजच पुष्पगुच्छ घेऊन नासुप्रमध्ये पोहचले. मात्र, विश्वस्त उपस्थित
गले. राष्ट्रवादी काँग्रेसने नासुप्र सभापती प्रवीण दराडे यांना पुष्पगुच्छ भेट देत उपहासात्मक अभिनंदन केले.