शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आवाजावरून होणार आजाराचे निदान ! 'व्हॉइस ॲनालिटिक्स'चा वापर; नागपूर 'एम्स' व 'आयआयटी बॉम्बे'चा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:00 IST

Nagpur : अत्याधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने मोठे पाऊल टाकत 'एम्स' नागपूर येथे आवाजाच्या विश्लेषणाद्वारे (व्हॉइस अॅनालिटिक्स) आजारांचे लवकर निदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अत्याधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने मोठे पाऊल टाकत 'एम्स' नागपूर येथे आवाजाच्या विश्लेषणाद्वारे (व्हॉइस अॅनालिटिक्स) आजारांचे लवकर निदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित या तंत्रज्ञानामुळे स्पष्ट लक्षणे दिसण्यापूर्वीच काही गंभीर आजारांचा मागोवा घेणे शक्य होणार असल्याची माहिती 'एम्स'चे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी दिली.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असताना आवाज हा एक महत्त्वाचा जैविक संकेत ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे. मानवी आवाजातील स्वर, कंपन, गती, लय आणि उच्चारांमधील सूक्ष्म बदल अनेकदा शरीरातील किंवा मानसिक आरोग्यातील बदलांचे संकेत देतात. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरने 'आयआयटी बॉम्बे'च्या सहकार्याने आवाजावर आधारित निदान प्रणाली विकसित करण्यावर संशोधन सुरू केले आहे.

पारंपरिक तपासण्यांच्या तुलनेत लवकर निदान

पारंपरिक तपासण्यांच्या तुलनेत ही पद्धत जलद, कमी खर्चिक आणि सहज उपलब्ध ठरू शकते. विशेषतः ग्रामीण किंवा संसाधनअभावी भागांमध्ये प्राथमिक तपासणीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. मोबाईल किंवा टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मशी जोडल्यास घरबसल्या तपासणी करणेही भविष्यात शक्य होऊ शकते. सध्या यावर संशोधन सुरू आहे.

बंद खोलीत रुग्णाकडून ठरावीक मजकुराचे वाचन

डॉ. जोशी यांनी सांगितले, या प्रकल्पांतर्गत रुग्णांना ध्वनिनियंत्रित खोलीत ठरावीक मजकूर वाचायला सांगितले जाते. त्यानंतर प्रगत अल्गोरिदम आवाजातील सूक्ष्म नमुने ओळखून त्यांचे विश्लेषण करतात. नैराश्य, श्वसनविकार, पार्किन्सनसारखे न्यूरोलॉजिकल आजार तसेच काही विकारांची प्रारंभिक चिन्हे या प्रक्रियेतून शोधता येऊ शकतात.

जशी बाळाच्या रडण्यावरून आई गरज ओळखते

डॉ. जोशी यांनी सांगितले की, जशी आई बाळाच्या रडण्यावरून त्याची गरज ओळखते, तशीच प्रशिक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता आवाजातील बदलांवरून आजारांचे संकेत ओळखू शकते. लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात आणि रुग्णांचे जीवनमान सुधारते.

"संशोधन, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय कौशल्य यांचा संगम साधत 'एम्स' नागपूर हे 'डिजिटल हेल्थकेअर'ला नवी दिशा देऊ पाहत आहे. आरोग्यसेवेचे भवितव्य हे तंत्रज्ञान-सक्षम आणि रुग्णकेंद्रित असेल, असा विश्वास आहे. त्यात 'व्हॉइस अॅनालिटिक्स'मुळे निदान प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडू शकतो. भविष्यात नियमित आरोग्य तपासणीचा एक भाग म्हणून 'व्हॉइस टेस्ट'केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही."-डॉ. प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक, एम्स नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Disease diagnosis via voice analysis: AIIMS Nagpur & IIT Bombay initiative.

Web Summary : AIIMS Nagpur and IIT Bombay are researching voice analytics for early disease detection. AI-powered technology analyzes voice nuances to identify conditions like depression and respiratory issues, enabling timely interventions and improved patient outcomes. This cost-effective method could revolutionize healthcare.
टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य