हवामानातील बदलामुळे साथरोग

By Admin | Updated: September 10, 2014 00:47 IST2014-09-10T00:47:22+5:302014-09-10T00:47:22+5:30

प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण, नियोजन नसलेले शहरीकरण तसेच पर्यावरणातील हवामानबदलासारखी आव्हाने यांचा साथरोगाच्या प्रसारावर खूप परिणाम होतो. त्यामुळेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू,

Disease with climate change | हवामानातील बदलामुळे साथरोग

हवामानातील बदलामुळे साथरोग

मेडिकल : आयडीएसपीतर्फे कार्यशाळेचे उद्घाटन
नागपूर : प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण, नियोजन नसलेले शहरीकरण तसेच पर्यावरणातील हवामानबदलासारखी आव्हाने यांचा साथरोगाच्या प्रसारावर खूप परिणाम होतो. त्यामुळेच डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, कावीळ तसेच चिकनगुनियासारखे रोग पूर्वी जेथे आढळत नव्हते अशा देशांमध्ये आढळून येत आहेत. यावर उपाय म्हणून साथरोगांचा आठवडी अहवाल कटाक्षाने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
परिणामी भविष्यातील संभाव्य उद्रेक टाळणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकाल्पांतर्गत फिल्ड इपिडेमियालॉजीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे (एफईटीपी) मुख्य संयोजक डॉ. अरुण हुमणे यांनी येथे केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
दोन आठवडे चालणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, उपअधिष्ठाता डॉ. एन.जी. तिरपुडे, डॉ. एम.जी. मुद्देश्वर, डॉ. वृंदा सहस्रभोजने व डॉ. पी.जी. दीक्षित उपस्थित होते.
डॉ. हुमणे म्हणाले, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत कार्यरत जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामुळे साथरोगाचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी वेळीच प्रभावी पावले उचलणे शक्य होते. यामुळे साथरोगामुळे होणारी मानवी व आर्थिक हानी टाळता येते. आठवडी अहवालामुळे साथरोगावर लक्ष ठेवणे आणखी सोपे झाले आहे.
डॉ. सिंग यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, देशात असलेल्या सात प्रशिक्षण केंद्रांपैकी नागपूरच्या या मेडिकलमध्ये हे एक केंद्र आहे, याचा अभिमान आहे. उद्घाटनानंतर डॉ. हुमणे, डॉ. उदय नार्लावार, डॉ. प्रभाकर हिवरकर, डॉ. अशोक जाधव, डॉ. सुभाष ठाकरे, डॉ. प्रशांत बागडे, डॉ. सुरेश उघडे आणि डॉ. प्रकाश भातकुले यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षण समन्वय समितीचे डॉ. सरिता वाधवा, डॉ. सोनाली पाटील, डॉ. प्रगती राठोड व डॉ. देबाशिष परमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. वसंत ढगे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. समीर गोलावर, डॉ. प्रवीण घोंगडे, डॉ. मृणाली राहूड आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Disease with climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.