शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
6
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
7
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
8
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
9
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
10
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
11
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
12
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
13
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
14
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
15
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
16
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
17
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
18
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
19
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
20
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द

नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:09 AM

दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देव्हायरल ताप, अस्थमाच्या रुग्णांत वाढ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. विशेषत: अस्थामचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. पुढील काही दिवस श्वसन किंवा नाक, घसा यांच्याशी निगडित त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या आहे.दिवाळीच्या तोंडावरच अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण तयार होऊन शनिवारी मुसळधार पाऊसही पडला आहे. अशा वातावरणामुळे फटाक्यांचा धूर हा वर न जाता खालीच राहतो. परिणामी, गेल्या दोन दिवसात श्वसनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले, फटाक्यांच्या धुरातून सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड आणि फॉस्फरस वातावरणात पसरतो. या शिवाय विविध घातक रसायनही हवेत मिसळतात. यामुळे प्रदूषणात वाढ होते. सध्या फुटत असलेले फटाके, व वातावरणात बदल झाल्याने श्वसन विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. फटाक्यांच्या धुराचा सर्वाधिक त्रास हा अस्थामाच्या रुग्णांसोबतच लहान मुले व वृद्धांना होतो. फटाक्याच्या धुराने दम लागणे, छातीत टोचणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका, जीव घाबरणे, अ‍ॅलर्जिक खोकला, छातीत खरखर होणे यासारख्या विकाराना काहींना सामोरे जावे लागत आहे.लहान मुलांना सांभाळाडॉ. मेश्राम म्हणाले, लहान मुलांच्या श्वसननलिका अत्यंत नाजुक असतात. त्यांना फटाक्यांच्या घातक धुरांचा अधिक धोका असतो. अनेकवेळा कायमस्वरुपी श्वसनाचा आजार जडण्याची शक्यता असते. काही प्रकरणात फटाक्यांच्या धुरामुळे अस्थम्याचा अटॅक येण्याचा धोका असतो.फटाक्यांपासून दूर रहाअस्थमाच्या किंवा श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी फटाक्यांपासून दूर रहावे. शक्य झाल्यास जिथे धुराचे प्रमाण कमी राहील अशा ठिकाणी जावे. घराच्या दारे-खिडक्या बंद ठेवाव्यात. नाकाला मास्क बांधावा किंवा रुमालीची डबल घडी करून बांधावी. नियमित औषधे घ्यावीत. आजार वाढल्यास किंवा अटॅक आल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे. या शिवाय, तेलकट फराळ खाऊ नये, असा सल्लाही डॉ. मेश्राम यांनी दिला.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर