‘अॅलेक्सिस’मध्ये ‘गर्भाशयाच्या कॅन्सर’वर चर्चा
By Admin | Updated: May 7, 2017 02:24 IST2017-05-07T02:24:28+5:302017-05-07T02:24:28+5:30
‘गर्भाशयाचा कॅन्सर’भारतीय महिलांमध्ये आढळून येणे, ही सामान्य बाब आहे.

‘अॅलेक्सिस’मध्ये ‘गर्भाशयाच्या कॅन्सर’वर चर्चा
नामांकित कॅन्सर तज्ज्ञ : आजारावर आधुनिक उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘गर्भाशयाचा कॅन्सर’भारतीय महिलांमध्ये आढळून येणे, ही सामान्य बाब आहे. या जीवघेण्या आजाराची माहिती करून देण्याच्या उद्देशाने अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरने या आजाराचा प्राथमिक अवस्थेत शोध आणि त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी ‘चान्स टू चेंज’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत हॉस्पिटलतर्फे पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले.
चर्चेत युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाचे (सॅन फ्रॅन्सिस्को) नामांकित कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. पामेला मून्स्टर उपस्थित होत्या. त्यांच्यातर्फे यूएईमध्ये अशीच मोहीम राबविण्यात येते. याशिवाय पॅनल चर्चेत डॉ. अमोल डोंगरे, डॉ. सूरज अग्रवाल, डॉ. रजनी गुप्ता, डॉ. भास्कर गुप्ता. डॉ. पुनीत सेठ आणि डॉ. चांदणी होतवानी उपस्थित होते. तज्ज्ञांनी कॅन्सरच्या उपचारादरम्यान मानसिक, भौतिक आणि सामाजिक वेदनांच्या व्यवस्थापनावर विचार मांडले.
डोंगरे यांनी कॅन्सर घातकच आहे, पण गर्भाशयाचा कॅन्सर बरा होऊ शकतो. प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास निश्चितच बरा होतो. यात रेडिएशन थेरपीची महत्त्वाची भूमिका असते. काही स्तरानंतर हा आजार गंभीर बनतो, डॉ. पुनीत सेठ यांनी सांगितले. चार स्तरानंतरही किमोथेरपी आणि रेडिओथेरपीने चांगला निकाल येतो, असे डॉ. चांदणी होतवानी म्हणाले. यावेळी गर्भाशयाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मनप्रीत पारसेचा यांनी आपले अनुभव कथन केले. (वा.प्र.)