शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई विद्यार्थ्यांसोबत केला जातो भेदभाव; असमानतेच्या वागणुकीवर व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:35 IST

Nagpur : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत जाण्यास टाळाटाळ करीत असतात. ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे. शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश साध्य होण्यासाठी प्रवेशाच्या निकषासह शाळा व्यवस्थापनाची मानसिकताही बदलण्याची गरज आहे, असे मौखिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संबंधित जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवले.

याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अनिल पानसरे व निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी वादग्रस्त निर्णय जारी करून आरटीई जागांवर प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून केवळ एक किलोमीटर परिसरात असलेली खासगी विनाअनुदानित शाळा निवडणे बंधनकारक केले होते. या निकषाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे व वैभव कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्या १२ मार्च रोजी न्यायालयाने अंतराचा निकष रद्द करण्याचा आदेश दिला होता. तसेच, आरटीई प्रवेशाकरिता अंतराचे निकष ठेवण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे हा निकष अवैध आहे, असे स्पष्ट करून कायद्याचा उद्देश साध्य करण्यासाठी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना त्याच्या पसंतीने कोणत्याही शाळेत प्रवेश घेता आला पाहिजे, असे सांगितले होते.

असे असताना प्राथमिक शिक्षण संचालकांनी या आदेशाच्या विसंगत असलेले पत्र जारी केले. परिणामी, न्यायालयाने सरकारच्या बेकायदेशीर भूमिकेवर नाराजी व्यक्त करून आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीकडेही लक्ष वेधले. 

सर्व शाळांचे पर्याय मोकळे पाहिजे

उच्च न्यायालयाने अंतराचा निकष रह करण्याचा आदेश दिल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकांनी काढलेल्या विसंगत पत्रामध्ये त्यांनी, तीन किलोमीटर अंतराचा निकष लागू केल्यास ९५ ते ९७टक्के विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळतील आणि उर्वरित विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर परिसराबाहेरच्या शाळेत प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. न्यायालयाने हे पत्र फेटाळून लावले. शिक्षक हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता सर्व शाळांचे पर्याय मोकळे पाहिजे. त्याला हवा त्या शाळेत प्रवेश घेता आला पाहिजे, असे स्पष्ट करून प्रवेशाचे संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याचे निर्देश सरकारला दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Students Face Discrimination; Concerns Raised Over Unequal Treatment

Web Summary : Nagpur High Court expressed concern over discrimination against RTE students in private schools. The court emphasized the need to change school management's mindset and provide equal opportunities. Directives were issued to ensure all school options are open for RTE admissions, overriding distance criteria.
टॅग्स :nagpurनागपूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा