लाखोच्या कोळसा चोरीचे प्रकरण न्यायालयात ‘डिस्चार्ज’

By Admin | Updated: May 31, 2014 01:01 IST2014-05-31T01:01:56+5:302014-05-31T01:01:56+5:30

कळमना पोलिसांनी दाखल केलेले लाखोवर कोळसा चोरीचे एक प्रकरण आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांच्या न्यायालयाने तडकाफडकी ‘डिस्चार्ज’ करून दोन्ही ट्रकचालक आरोपींची सुटका केली.

'Discharge' in coal block allocation case | लाखोच्या कोळसा चोरीचे प्रकरण न्यायालयात ‘डिस्चार्ज’

लाखोच्या कोळसा चोरीचे प्रकरण न्यायालयात ‘डिस्चार्ज’

कळमना पोलिसांची अतिरेकी कारवाई
नागपूर : कळमना पोलिसांनी दाखल केलेले लाखोवर कोळसा चोरीचे एक प्रकरण आज प्रथम  श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांच्या न्यायालयाने तडकाफडकी ‘डिस्चार्ज’ करून दोन्ही  ट्रकचालक आरोपींची सुटका केली.
जप्त कोळसा वैध असल्याचे कागदोपत्री पुरावे असतानाही पोलिसांनी ही अतिरेकी कारवाई  केल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार नंदनवन येथील रहिवासी दिलीप कमलकिशोर सिकची हे श्री कोल कॅरियरचे  मालक असून डिगी कॉटसिन या कंपनीचे ट्रान्सपोर्ट एजंट आहेत.
श्री कोल कॅरियरमार्फत ट्रकचालक मोहम्मद मेहतमाम कौसरअली (२४) रा. सद्भावनानगर  सावनेर हा आपल्या एमएच-३१-सीबी-९११५ क्रमांकाच्या ट्रकमधून आणि नाजीर हुसेन सईद  हुसेन (२५) रा. वलनी हा  एमएच -३१-सीजी- ७३५ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रत्येकी १५.५00  टन कोळशाची वाहतूक करीत होते.
कापसी येथील धरमकाट्यामागे असलेले हे दोन्ही ट्रक काल २९ रोजी सायंकाळी ७.४५ वाजताच्या  सुमारास कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. या कोळशाबाबत  अधिकृत कागदपत्रे नाहीत, असे नमूद करून पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ (१),  अ, ड आणि ३७९ (चोरी) कलमांतर्गत दोन्ही ट्रकचालकांना अटक केली. १ लाख २0 हजार  रुपये किमतीचा ३१ टन कोळसा आणि दोन ट्रक, असा एकूण ९ लाख २0 हजार रुपये किमतीचा  माल जप्त केला. खुद्द हेड कॉन्स्टेबल वसंता कनकदंडे यांनी राज्य सरकारतर्फे फिर्याद नोंदवून ही  कारवाई केली.
आज या दोन्ही आरोपी ट्रकचालकांना पोलिसांनी न्यायालयात हजर करून ११ जूनपर्यंंंंत त्यांच्या  न्यायालयीन कोठडीची मागणी केली. आरोपींचे वकील अँड. विलास सेलोकर आणि अँड. सतीश  गडे यांनी पोलिसांनी जप्त केलेला कोळसा अधिकृत असल्याच्या पावत्या आणि इतर दस्तऐवज  न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दस्ताऐवज तपासून हे प्रकरण ‘डिस्चार्ज’ केले आणि दोन्ही  आरोपींची निर्दोष सुटका केली. (प्रतिनिधी)
 

Web Title: 'Discharge' in coal block allocation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.