लोहमार्ग पोलीस दीपक डोर्लीकर यांना महासंचालक अवॉर्ड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:55+5:302021-02-05T04:54:55+5:30
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अकोला येथील सहायक पोलीस आयुक्त यशवंत सिंहल आणि नागपुरातील ...

लोहमार्ग पोलीस दीपक डोर्लीकर यांना महासंचालक अवॉर्ड ()
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अकोला येथील सहायक पोलीस आयुक्त यशवंत सिंहल आणि नागपुरातील स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार दीपक डोर्लीकर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस महासंचालक अवॉर्ड देऊन सन्मानित केले. १ मे २०२० रोजी पोलीस महासंचालकांनी या पुरस्कारांची घोषणा केली होती. पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर यांनी आपल्या २६ वर्षांच्या कार्यकाळात बिहार, हरियाणा, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आदी राज्यात जाऊन गुन्हेगारांना अटक केली. आतापर्यंत त्यांना १५० पुरस्कार आणि १० प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांच्या हस्ते मॅन ऑफ दी अरचा अवॉर्ड देण्यात आला होता.
.........