पोलीस महासंचालकांनी घेतली अधीक्षकांची बैठक
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:18+5:302015-12-05T09:10:18+5:30
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच नागपुरात पोहचलेले पोलीस महासंचालक (डीजी) ...

पोलीस महासंचालकांनी घेतली अधीक्षकांची बैठक
हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताचा आढावा
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच नागपुरात पोहचलेले पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतली.
दीक्षित आज सकाळी रेल्वेने नागपुरात पोहचले. साधेपणा आणि शिस्त यासाठी परिचित असलेल्या दीक्षित यांनी स्थानकावर आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हसतमुखाने हस्तांदोलन करताना पोलीस जिमखाना गाठला.
दुपारी शहरातील अधिकाऱ्यांशी धावती बातचित केल्यानंतर त्यांनी दुपारी ३ वाजता नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
बैठकीला नागपूर ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंह, भंडाऱ्याचे अधीक्षक दिलीप झळके, गोंदियाचे अधीक्षक मीणा, वर्धा येथील अंकित गोयल आणि चंद्रपूरचे अधीक्षक संदीप दिवाण हजर होते. गडचिरोलीचे अधीक्षक संदीप पाटील अनामिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. बैठकीत डीजींनी सर्व पोलीस अधीक्षकांकडून त्यांच्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेची माहिती घेतली. त्यांना अधिवेशन काळात अधिकाधिक चांगली स्थिती ठेवण्याची आणि गुन्हे कमी करण्याच्या सूचना केल्या. जिव्हाळ्याचा विषय असलेले ‘पोलीस मित्र‘ वाढवण्यावरही दीक्षित यांनी भर दिला. (प्रतिनिधी)