शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

४९.१९ कोटीच्या खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटप्रकरणी संचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST

नागपूर : कंपनी अस्तित्वात नसताना आणि बनावट पावत्यांच्या आधारे केंद्रीय जीएसटी विभागाकडून ४९.१९ कोटींची खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल ...

नागपूर : कंपनी अस्तित्वात नसताना आणि बनावट पावत्यांच्या आधारे केंद्रीय जीएसटी विभागाकडून ४९.१९ कोटींची खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणाच्या घोटाळ्यात पॅन इंडिया कंपनीच्या संचालकाला जीएसटी (वस्तू व सेवा कर) गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटने कारवाई करून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बनावट पावत्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून डीजीजीआय नागपूर झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट स्रोताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करदात्याने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बांधकाम कराराची सेवा पुरविल्याचे आढळून आले. त्याने केवळ कागदावर नागपूर येथे जीएसटीआयएन मिळविला होता आणि त्याच्या नावावर शेकडो कोटीचे व्यवहार केले जात होते.

वेगवेगळ्या ठिकाणी शोधकार्य हाती घेऊन या जीएसटीआयएनच्या घोषित केलेल्या सर्व परिसरातील पूर्वीच्या आणि वर्तमान मालकांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जीएसटीआयएन नागपुरात प्रत्यक्ष अस्तित्वात नाही आणि बनावट स्वाक्षऱ्या असलेली बनावट कागदपत्रे अपलोड केली गेली होती. या कंपनीतर्फे जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी अस्तित्वात नसलेला प्रकार लपविल्याचे दिसून आले.

या अस्तित्वात नसलेल्या जीएसटीआयएनच्या संचालकाला रायपूर (छत्तीसगड) येथे शोधण्यात आले. अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भात पुरावे सापडले. अधिकाऱ्यांनी त्याला सीजीएसटी अधिनियम २०१७ च्या कलम ६९ अन्वये नागपूर येथे अटक केली. त्याला १ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता, न्यायमूतींनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.