४९.१९ कोटीच्या खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटप्रकरणी संचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:08+5:302020-12-04T04:22:08+5:30
नागपूर : कंपनी अस्तित्वात नसताना आणि बनावट पावत्यांच्या आधारे केंद्रीय जीएसटी विभागाकडून ४९.१९ कोटींची खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल ...

४९.१९ कोटीच्या खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटप्रकरणी संचालकाला अटक
नागपूर : कंपनी अस्तित्वात नसताना आणि बनावट पावत्यांच्या आधारे केंद्रीय जीएसटी विभागाकडून ४९.१९ कोटींची खोट्या इनपुट टॅक्स क्रेडिटची उचल करणाच्या घोटाळ्यात पॅन इंडिया कंपनीच्या संचालकाला जीएसटी (वस्तू व सेवा कर) गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटने कारवाई करून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे.
बनावट पावत्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून डीजीजीआय नागपूर झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट स्रोताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करदात्याने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून बांधकाम कराराची सेवा पुरविल्याचे आढळून आले. त्याने केवळ कागदावर नागपूर येथे जीएसटीआयएन मिळविला होता आणि त्याच्या नावावर शेकडो कोटीचे व्यवहार केले जात होते.
वेगवेगळ्या ठिकाणी शोध कार्य हाती घेऊन या जीएसटीआयएनच्या घोषित केलेल्या सर्व परिसरातील पूर्वीच्या आणि वर्तमान मालकांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जीएसटीआयएन नागपुरात प्रत्यक्ष अस्तित्वात नाही आणि बनावट स्वाक्षऱ्या असलेली बनावट कागदपत्रे अपलोड केली गेली होती. या कंपनीतर्फे जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी अस्तित्वात नसलेला प्रकार लपविल्याचे दिसून आले.
या अस्तित्वात नसलेल्या जीएसटीआयएनच्या संचालकाला रायपूर (छत्तीसगड) येथे शोधण्यात आले. अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भात पुरावे सापडले. अधिकाऱ्यांनी त्याला सीजीएसटी अधिनियम २०१७ च्या कलम ६९ अन्वये नागपूर येथे अटक केली. त्याला १ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता, न्यायमूतींनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.