शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

तंत्रज्ञानातून बदलली शेतीची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:20 IST

मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकºयाने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली.

ठळक मुद्देआदासाच्या तरुण शेतकऱ्याचे पाऊलदहा एकरात घेतले ६५० टनावर मिरचीचे उत्पादन

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, शेती आता फायद्याचा सौदा राहिलेला नाही, अशा नकारात्मक गोष्टी आपण सातत्याने ऐकतो. परंतु नकारात्मता सोडून सकारात्मक विचाराने पाऊल टाकले आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड दिली तर शेतीही आयुष्याची दशा आणि दिशा बदलू शकते.मौद्याजवळच्या आदासा गावातील संजय प्रभूदास आतीलकर या तरुण शेतकऱ्याने कृषी व्यवसायाची दिशा बदलत निराशाजनक वातावरणात प्रेरणादायी वाट निर्माण केली. या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून दहा एकराच्या शेतीत मिरचीचे ६५० टनाच्या वर उत्पादन घेण्यात यश मिळविले.संजय आतीलकर यांचे वडील तसे सधन शेतकरी. त्यांच्याकडे १२ एकर शेती आहे. शिवाय इतरांकडूनही ठेक्याने घेत ते शेती करायचे. मात्र त्यांनी पारंपरिक शेतीशिवाय दुसरा पर्याय कधी निवडला नाही. संजय यांनी कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुलाने शेतीऐवजी नोकरी करावी, ही वडिलांची इच्छा होती. मात्र संजय यांनी केवळ वर्षभर नोकरी करून मोर्चा शेतीकडेच वळविला. वडील नाराज झाले. पण संजय यांनी विचार बदलला नाही. सुरुवातीचे तीन-चार वर्ष त्यांनीही पारंपरिक शेतीला प्राधान्य दिले. यात फार लाभ दिसत नव्हता.अशात कृषितज्ज्ञ राहुल फुसे यांचे मार्गदर्शन संजय यांना मिळाले. संजय यांनी जळगाव येथे ड्रीप सिंचनाच्या सुविधेची माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार एक प्रयोग म्हणून एक वर्ष केवळ एका एकरात ड्रीप सिंचनाच्या सोयीने मिरचीची लागवड केली. चांगले परिणाम दिसून आले. पुढल्या वर्षी तब्बल १० एकरात ड्रीप सिंचनाची सुविधा करून मिरचीची लागवड केली. साडेतीन एकरमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरची लावली. हा प्रयोग यशस्वी ठरला. काही दिवसातच झाडे पाच फुटापर्यंत वाढली. पहिल्या व दुसऱ्या तोड्यात प्रमाण कमी होते, तिसऱ्या व चौथ्या तोड्यात उत्पादन प्रतिएकर ८ टनावर गेले. प्रत्येक तोड्यात ८० टनाप्रमाणे ६५० टनापेक्षा अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा ३० लाखांवर म्हणजेच दुप्पट होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.थेट दिल्लीला रवाना केला मालसंजय यांच्या प्रेरणेने इतर शेतकऱ्यांनीही मिरचीचे उत्पादन सुरू केले आहे. पण ते एवढ्यावर थांबले नाही. आपला माल दलालामार्फत विक्री करण्यापेक्षा स्वत:च का पाठवू नये, हा निर्धार त्यांनी केला व दिल्लीला माल पाठविण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी एकावेळी १६ ते १७ टन माल गरजेचा होता. संजय यांनी आसपासच्या शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले. त्यांचाही माल गोळा करून थेट दिल्लीच्या मार्केटमध्ये रवाना केला. याचवर्षी सुरू केलेला हा प्रयोगही यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपासून मार्चपर्यंत ही निर्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :agricultureशेती