सभापतीच्या पत्राकडे डिम्टसने केला कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:27 IST2020-12-15T04:27:02+5:302020-12-15T04:27:02+5:30
नागपूर : कोरोनाच्या नावावर महापालिका प्रशासन पूर्णपणे सत्तापक्षावर दबाव टाकत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांशी निगडित प्रकरणांकडे खुलेआम दुर्लक्ष ...

सभापतीच्या पत्राकडे डिम्टसने केला कानाडोळा
नागपूर : कोरोनाच्या नावावर महापालिका प्रशासन पूर्णपणे सत्तापक्षावर दबाव टाकत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांशी निगडित प्रकरणांकडे खुलेआम दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर हेसुद्धा प्रशासनासमोर हतबल झाल्याचे दिसत आहे.
कायद्यानुसार स्थायी समितीसारखेच परिवहन समितीला पूर्ण अधिकार आहेत. परंतु सोमवारी सभापतीच्या पत्राकडे आयटीबीएम ऑपरेटर डिम्टसने खुलेआम कानाडोळा करून ६० आणखी आपली बस चालविण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी सोमवारी डिम्टसला पत्र देऊन तिन्ही डिझेल बस ऑपरेटर द्वारा आणखी २०-२० बसेसचे शहरात संचालन करण्याचे निर्देश दिले. सकाळीच हे पत्र डिम्टसचे टीम लीडर अंबाडेकर यांना पाठविण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत डिम्टसच्या वतीने काहीच आदेश जारी करण्यात आले नाहीत. सूत्रांनुसार डिम्टसच्या म्हणण्यानुसार ते सभापतीचे पत्र मान्य करू शकत नाहीत. प्रशासनाकडून त्यांना बस वाढविण्याबाबत काहीच पत्र मिळालेले नाही. सध्या शहरात १५७ बसेसचे संचालन करण्यात येत आहे. आपली बसचे प्रवासीही वाढत आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर आपली बसची सेवा सुरु करण्याची गरज आहे.
..............
बसेस सुरु होणार
‘६० बसेस सुरु करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. लवकरच बसेस सुरु होणार आहेत. डिम्टस मनमानी करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल.’
-बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती
...............