शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

दिगंबर जैन मंदिराचा वेदी शिलान्यास १५ जून रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 11:07 PM

सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष किशोर मेंढे, सचिव पद्माकर बुलबुले यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिद्धेश्वर कॉलनी अंबानगर येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन चैत्यालय सेवा मंडळाद्वारे मंदिर वेदी शिलान्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून रोजी आचार्यश्री सुवीरसागरजी गुरुदेवांच्या ससंघ सानिध्यात हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष किशोर मेंढे, सचिव पद्माकर बुलबुले यांनी दिली आहे.आचार्य पदारोहणानंतर सुवीरसागरजी गुरुदेव ससंघ प्रथमच नागपूरला येत आहे. आचार्यश्री संघाचे १२ जूनला नागपूरला आगमन होईल. शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजता देव आज्ञा, गुरु आज्ञा होईल व उद्योगपती अरुण इंद्रकुमार श्रावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. सकाळी ६.३० वाजता अभिषेक व पूजन, ७ वाजता श्री आदिनाथ विधान, सकाळी १० वाजता आहारचर्या, दुपारी १ वाजता पुलक मंच परिवार महावीर वॉर्ड नागपूरचे संरक्षक जगदीश गिल्लरकर यांचे हस्ते वेदी शिलान्यास होईल. सायंकाळी ७ वाजता आरती, ७.३० ला आनंदयात्रा होईल. रविवार १६ जून रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक पूजन, सकाळी ८ वाजता धर्मसभा, १० वाजता आहारचर्या, सायंकाळी ७ वाजता आरती होईल. महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य पं. संजय सरस चिचोली हे आहेत. कार्यक्रमात प्रमुख अतिथी रामटेकचे म्हणून खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे हे उपस्थित राहतील.सोबतच नगरसेवक किशोर कुमेरिया, मंगला गवरे, पुलक मंच परिवार महावीर वॉर्ड नागपूरचे संरक्षक मनीष मेहता, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे माजी राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन पेंढारी, सतीश जैन पेंढारी, श्रवणभाई दोशी, नितीन नखाते, दिलीप शांतीलाल जैन, अभयकुमार पनवेलकर, सरला गडेकर, आनंदराव सवाने, राजकुमार जैन, डॉ. रिचा जैन, सुमत जैन, विवेक सोईतकर, दिलीप शिवणकर, दिलीप गांधी, चंद्रकांत वेखंडे, महेश नायक, प्रकाश मारवडकर, नितीन महाजन, मंगेश बिबे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश येळवटकर, वीरेंद्र गंगणे, धनंजय महात्मे, मनोज गिल्लरकर, राजकुमार भुसारी, सौरभ उदापूरकर, विजय मखे, दिलीप मूठमारे, राजेंद्र पिंजरकर हे कार्यरत आहेत.

 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरnagpurनागपूर