नागपूर - ‘एम्स’मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची ती मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
समृद्धी कृष्णकांत पांडे (२५, मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती ‘एम्स’मध्ये त्वचारोग विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. मैत्रिणीसोबत ती संबंधित फ्लॅटमध्ये राहत होती. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण ‘एम्स’मध्ये गेली. त्यावेळी समृद्धी घरी एकटीच होती. तिची मैत्रीण रात्री आठ वाजता घरी परत आली तेव्हा दरवाजा लॉक होता. तिने दरवाजा उघडला असता समृद्धी सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत होती.
याबाबत माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. समृद्धीचे वडील व कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अभ्यासात हुशार असूनही होती मोठ्या तणावाखालीसमृद्धी पांडे ही अभ्यासात हुशार होती. मात्र, काही दिवसांपासून ती तणावात होती. तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तपास सुरू आहे. मात्र, अद्याप कारण समोर आलेले नाही. ‘एम्स’मधील विद्यार्थी तणावात का?याअगोदर ‘एम्स’च्या वसतिगृहातील संकेत दाभाडे (२२, जिंतूर, परभणी) याने ऑगस्ट महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्यांना नेमका कोणता तणाव होता, असा सवाल आता या आत्महत्यांमुळे उपस्थित होत आहे.
Web Summary : DIG Krishnakant Pande's daughter, a medical student at AIIMS Nagpur, tragically committed suicide in her flat. The 25-year-old was studying dermatology. Police are investigating the cause of death, following a previous suicide at AIIMS, raising concerns about student stress.
Web Summary : डीआईजी कृष्णकांत पांडे की बेटी, जो एम्स नागपुर में मेडिकल की छात्रा थी, ने अपने फ्लैट में आत्महत्या कर ली। 25 वर्षीय छात्रा त्वचाविज्ञान की पढ़ाई कर रही थी। पुलिस मौत के कारणों की जांच कर रही है, एम्स में पहले भी एक आत्महत्या हुई थी, जिससे छात्रों के तनाव के बारे में चिंता बढ़ गई है।