शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
4
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
5
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
6
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
7
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
8
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
9
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
10
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
11
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
12
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
13
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
14
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
15
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
16
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
17
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
18
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
19
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
20
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
Daily Top 2Weekly Top 5

जिना मरना संग संग

By admin | Updated: July 19, 2014 02:32 IST

आजूबाजूच्या परिसरात राहाणारे ‘ते‘ दोघे

सुमित-अभिजितची ‘अमर’ मैत्री : जगले एकसाथ, मृत्यूही लागोपाठनागपूर : आजूबाजूच्या परिसरात राहाणारे ‘ते‘ दोघे जिवश्चकंठश्च मित्र. एकत्र खेळायचे, एकत्र फिरायचे. कामही एकसारखे आणि सोबतच करायचे. खाणेपिणेही एकत्र अन् दोघांचा बळी गेला तो एकाच अपघातात. ‘जिना मरना संग संग‘चा प्रत्यय देणारी ही घटना सुमित-अभिजित या तरुणाच्या ‘अमर‘ मैत्रीचेही प्रतीक ठरावी. सुमित हरिश्चंद्र गिरे (वय २७, रा. मानेवाडा) आणि अभिजित ज्ञानेश्वर पाटील (वय २९, रा. उमरेड रोड नागपूर) हे दोघे मित्र. एकमेकांना जीवापाड जपणारे. सोबत खेळणे, फिरणे, खाणेपिणे आणि कामही सोबतच करणे. एकमेकांना टाकून ते कोणतेच काम करीत नव्हते. संगणकाच्या सुट्या भागाची विक्री अन् दुरुस्ती सेवा हे दोघे देत होते. याच कामाच्या निमित्ताने ते १५ जुलैला वाडीला गेले होते. रात्री ८.१५ ला सुमित आणि अभिजित मोटरसायकलवरून रविनगर चौकाकडे जात होते. त्यांच्यासमोर एक कार होती तर मागे तेलाचे पिंप भरलेला ट्रक (एमएच ३६/ एस - १५६५) होता. उतारावरून खाली उतरताच ट्रकचालकाने जास्तच गती वाढवली आणि समोरच्या दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकी समोरच्या कारवर आदळली. एवढे होऊनही ट्रकचालकाने गती कमी केली नाही. त्यामुळे ट्रक आणि कारच्या मध्ये दुचाकी आणि त्यावर बसलेले सुमित तसेच अभिजित चिरडले गेले. सुमितचा जागीच मृत्यू झाला तर अभिजितवर डॉ. पिनाक दंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बुधवारी सकाळी सिम्स इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी अभिजितला बचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अभिजितच्या कुटुंबीयांनी त्याच्या उपचारावर तब्बल ७ ते ८ लाख रुपये खर्च केले. मात्र, अभिजितचा प्राणप्रिय मित्र सुमित त्याच्या डोळ्यादेखतच अपघातात दगावला होता. त्यामुळेच की काय, अभिजितने उपचाराला दाद दिली नाही. आज सकाळी अभिजितने प्राण सोडला. (प्रतिनिधी)दुसरा आघातसुमित अभिजितची घट्ट मैत्री दोन्ही कुटुंबीयांच्या अन् एकमेकांच्या मित्रांच्याही परिचयाची होती. दिवसातील बराच वेळ ते सोबतच दिसायचे. मात्र, एकाच अपघातात त्या दोघांचाही बळी जाईल, असा कुणी विचारही केला नव्हता. सुमितच्या मृत्यूमुळे पहिला तर, अभिजितच्या मृत्यूमुळे या दोन्ही कुटुंबीयांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना दुसरा धक्का बसला. पाटील कुटुंबीय कोलमंडलेअभिजितचे वडील हिंगण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. १४ वर्षांपूर्वी त्याची बहीण भुसावळहून येत असताना तिचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. आता ऐन तारुण्यात असलेला अभिजित गेल्याने पाटील कुटुंबीय अक्षरश: सुन्न झाले आहे.