लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या परभणीच्या एका विद्यार्थ्याचे रॅगिंग घेऊन त्याला जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा संतापजनक प्रकार चर्चेला आला आहे. आपले पाप समोर येऊ नये म्हणून या विद्यार्थ्याला नंतर विषारी द्रवपदार्थही पाजण्यात आल्याचे समजते. गंभीर अवस्थेतील या विद्यार्थ्याला सीताबर्डीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विष्णू पवार असे पीडित विद्यार्थ्याचे नाव असून, तो परभणीचा मूळ निवासी असल्याचे समजते.अजनीच्या कुकडे ले-आऊट परिसरातील शासकीय आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. तेथे पवार राहतो. २१ फेब्रुवारीच्या दुपारी त्याच्याच सोबतच्या काही जणांनी रँगिंगच्या नावाखाली त्याला प्रारंभी जबरदस्तीने मूत्र पाजल्याचे समजते. त्याला ओकाऱ्या सुरू झाल्यानंतर आरोपी घाबरले. आपल्या पापाची ओरड होऊ नये म्हणून आरोपींनी त्याला विषाक्त द्रव पदार्थ पाजला. पवारने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. त्यामुळे बाजूचे काही विद्यार्थी धावून आले. वसतिगृहातील मंडळीही धावली. त्यांनी गंभीर अवस्थेतील पवारला सीताबर्डीच्या एका रुग्णालयात दाखल केले.माहिती कळताच त्याचे पालक येथे पोहचले. मंगळवारी दुपारी या घटनेची सर्वत्र वाच्यता झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. विशेष म्हणजे, सात दिवस होऊनही या प्रकरणाची अजनी किंवा सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. मंगळवारी रात्री या संबंधाने विचारणा केली असता अजनी पोलिसांनी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
नागपुरात वसतिगृहातील विद्यार्थ्याला मूत्र पाजले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:13 IST
अजनीतील शासकीय आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या परभणीच्या एका विद्यार्थ्याचे रॅगिंग घेऊन त्याला जबरदस्तीने मूत्र पाजल्याचा संतापजनक प्रकार चर्चेला आला आहे.
नागपुरात वसतिगृहातील विद्यार्थ्याला मूत्र पाजले ?
ठळक मुद्देविषही पाजल्याची ओरड : अजनीतील कुकडे ले-आऊटमधील घटना : पोलिसांकडून गुन्हा दाखल नाही