शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

ब्राह्मोसच्या भविष्यातील घडामोडींचाही डाटा झाला लिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:30 AM

निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षांचे तंत्रज्ञान शत्रूंना सोपविल्याचा संशयसुरक्षेचे कवच पोखरले

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निशांत अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी ब्राह्मोसच्या केवळ विद्यमान नव्हे तर भविष्यातील वेधाचेही तंत्रज्ञान लिक केल्याचा संशयवजा अंदाज तपास यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. निशांत आणि त्याच्या साथीदारांनी ११ मार्च २०१७ ते आॅक्टोबर २०१८ पर्यंतचा एकत्रित डाटाही तयार करण्यात आला असावा, असा संशय असल्याचे खास सूत्रांचे सांगणे आहे.ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलचे ११ मार्च २०१७ ला सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांनी यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. त्यातून बनविण्यात आलेल्या अहवाला(रिपोर्ट)चे मुद्दे एकत्रित करून २७ मार्चला एक रिपोर्ट तयार करण्यात आला. तो निशांत तसेच त्याच्या साथीदारांनी वेगवेगळ्या स्वरूपात पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयकडे सोपविण्यात आला होता. निशांतने त्याचेच प्रेझेन्टेशन प्रारंभी दिले होते, असा संशय आहे. नंतर मात्र आयएसआयच्या हस्तकांकडून मिळालेल्या सूचना-मागणीनुसार वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती तिकडे पाठविण्यात आल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी आतापर्यंतच्या तपासातून काढला असल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात बोलताना दुसऱ्या एका वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला तपास यंत्रणांनी दोन आठवड्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून डिफेन्स मटेरियल आणि स्टोर्स रिसर्च डिपार्टमेंटशी संबंधित कानपुरातील दोघांची नावे अधोरेखित झाली. त्यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीनंतर सोमवारी निशांत अग्रवालकडे छापा मारून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आता पुन्हा रफिकुल नामक एक व्यक्ती तपास यंत्रणेच्या हाती लागला. त्याच्याकडून डीआरडीओशी संबंधित माहितीची एक किट हाती लागली. त्यात विद्यमान ब्राह्मोस आणि दोन वर्षानंतर लॉन्च करण्याची तयारी सुरू असलेल्या ब्रह्मोस-२ मिसाईलच्या संबंधाने काही सांकेतिक माहिती असल्याचे सांगितले जाते. त्यावरून निशांत आणि त्याच्या साथीदारांनी शत्रू राष्ट्रांच्या गुप्तचर संघटनांना भारताच्या सुरक्षेचे कवच पोखरल्यासारखे केले असल्याचा अतिगंभीर प्रकार पुढे आल्याचे अधिकारी म्हणतो.

दोन नद्या, दोन देश आणि दोन शत्रूभारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन नद्यांची नावे एकत्रित करून ब्राह्मोस हे नाव मिसाईलला देण्यात आले होते. ब्राह्मोस भारताच्या संरक्षण विभागाला बलाढ्य करणारी ठरले आहे. मात्र, पारंपरिक शत्रू पाकिस्तान आणि अमेरिकाने ब्राह्मोसचे तंत्रज्ञान माहीत करून घेण्यासाठी निशांतसह अनेकांना हनी ट्रॅपमध्ये फसवून डाटा लिक करून घेण्यात यश मिळवले, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोस